20 September 2020

News Flash

हा तर वर्णभेद; दीपिका विदेशी मीडियावर भडकली

हे काही चुकून झालेले नाही. हा तर वर्णभेद आहे

दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा

हॉलिवूडमध्येही अभिनयाचा ठसा उमटवणारी बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण विदेशी प्रसारमाध्यमांवर जबरदस्त भडकली आहे. विदेशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तिला प्रियांका चोप्रा या नावाने हाक मारली होती. त्यामुळे ती प्रचंड संतापली आहे. हा खरा वर्णभेद आहे, असा गंभीर आरोप तिने केला आहे. ही केवळ नाराज होण्याची गोष्ट नाही. याबाबत तुम्हीही नाराजी व्यक्त करायला हवी, असे ती भारतीय पत्रकारांना म्हणाली.

हे काही चुकून झालेले नाही. हा तर वर्णभेद आहे, अशा शब्दांत तिने आपला राग व्यक्त केला आहे. एका रंगाच्या दोन व्यक्ती एकच असू शकत नाहीत. भारतीय नागरिक या नात्याने तुम्ही त्यांना या काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत, असे आवाहनही दीपिकाने भारतीय पत्रकारांना केले. लॉरियलच्या एका कार्यक्रमात ती बोलत होती.

‘ट्रिपल एक्स’ सिनेमाच्या यशाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीसाठी लॉस एँजेलिसला गेली होती. दीपिका जेव्हा एलएएक्स विमानतळावरून बाहेर आली, तेव्हा तेथील चित्रकारांनी प्रियांका या नावाने हाक मारली. त्यामुळे त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. फक्त एक स्मितहास्य करून गाडीत बसले. असे दीपिकाने सांगितले. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं म्हणजे ते दुर्लक्षच असतं, असं मत दीपिकाने व्यक्त केले.

काही दिवसांपूर्वी प्रियांकानेही यावर आपले मत मांडले होते. ‘दीपिकाला मी समजणे योग्य नाही. मला वाटतं की, मी सर्वात जास्त प्रसिद्ध गव्हाळ वर्णीय व्यक्ती आहे. पण सगळ्या गव्हाळ वर्णीय व्यक्ती एक नसतात. यात चुका करू नका. हे खूप चुकीचं होतं. ती भारतातली एक मोठी स्टार आहे, असे ती म्हणाली होती. सध्या दीपिका संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. नुकतेच दीपिकावर एक गाणे चित्रीत करूनही झाले आहे. सिनेमात दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 9:11 pm

Web Title: deepika padukone answered on the matter when foreign media confused her with priyanka chopra
Next Stories
1 मनिषा कोईरालाच्या ‘डिअर माया’चा ट्रेलर प्रदर्शित
2 Baahubali 2 box office collection day 7: ‘बाहुबली २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन बघून तुम्हीही व्हाल चकीत!
3 कपिलच्या शोचा घसरलेला टीआरपी पाहून सुनील म्हणतो..
Just Now!
X