News Flash

“हा पदार्थ मी आयुष्यभर न कंटाळता खाऊ शकते”; दीपिकाचं भन्नाट उत्तर

दीपिकानं केलं चाहत्यांसोबत लाईव्ह चॅट

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यामातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. यावेळी दीपिकाने आपल्या चाहत्यांसोबत गप्पा मारण्यासाठी इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट केलं होतं. या चॅटमध्ये एका चाहत्याने तिला तिचा आवडता पदार्थ विचारला? या प्रश्नावर दीपिका म्हणाली…

अवश्य पाहा – १२वीत कमी मार्क मिळाल्यामुळे अभिनेत्री नाराज; ‘या’ कारणामुळे झाला नव्हता अभ्यास

अवश्य पाहा – खरा सुपरहिरो! ‘या’ सहा वर्षांच्या मुलाला मार्व्हलने दिली ‘कॅप्टन अमेरिका’ची शिल्ड

असा कुठला पदार्थ आहे जो तू न कंटाळता दररोज खाऊ शकतेस? चाहत्याच्या या प्रश्नावर दीपिकाने तिचा आवडता पदार्थ सांगितला. पांढरा भात, सरम आणि त्यासोबत आंब्याचं लोणचं ती आयुष्यभर खाऊ शकते. यानंतर आणखी एका चाहत्याने लॉकडाउन नंतर ती सर्वप्रथम काय करणार? असा प्रश्न विचारला. यावर दीपिका म्हणाली लॉकडाउन संपताच ती आपल्या आई-वडिलांना जाऊन भेटणार आहे. चाहत्यांनी असे अनेक प्रश्न तिला विचारले.

यापूर्वी दीपिका तिच्या बेडरुम सिक्रेटमुळे चर्चेत होती. ‘फेमिना ब्युटी अवॉर्ड्स’मध्ये तिने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमादरम्यान तिने रणवीरच्या काही सवयींचा खुलासा केला. कार्यक्रमात बोलताना दीपिकाने बेडरुम सिक्रेटसुद्धा सांगितलं. खरंतर दीपिकाला रणवीरच्या ब्युटी सिक्रेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना दीपिका म्हणाली, “रणवीर अंघोळीला खूप जास्त वेळ घेतो आणि टॉयलेटमध्येही तो बराच वेळ असतो. त्याला तयार व्हायला माझ्यापेक्षाही जास्त वेळ लागतो आणि अंथरुणात यायलाही तो फार वेळ लावतो.” तिचं हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर सावरून घेत ती पुढे म्हणते, “मला असं म्हणायचं होतं की तो अंथरुणात झोपायला फार वेळ लावतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 6:25 pm

Web Title: deepika padukone can eat this dish for the rest of her life find out mppg 94
Next Stories
1 हाच खरा नायक! ६ वर्षांच्या ‘सुपरहिरो’ला फरहान अख्तरने केला सलाम
2 सुधीर मुनगंटीवारांनी शेअर केला ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचा व्हिडीओ, म्हणाले..
3 “कसलं बकवास गाणं आहे”; अभिनेत्याने केलं शहनाजच्या ‘कुर्ता पजामा’ गाण्यावर ट्विट
Just Now!
X