News Flash

दीपिका पदुकोणने रचला इतिहास; ठरली असा विक्रम करणारी पहिली भारतीय स्त्री

दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. दीपिकाच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढ होत चालली आहे. तिचे फॅन फॉलोईंग आता केवळ आपल्या देशापूरतेच मर्यादित न राहाता पार सातासमुद्रा पार गेले आहे. नुकतेच दीपिकाला लूई विटॉन ग्लोबल फॅशन मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

अवश्य वाचा – अभिनेता की अभिनेत्री? ओळखून दाखवाच…

अवश्य वाचा – “मन्नत’मध्ये एक खोली भाड्याने हवी’; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर

लूई विटॉन हा जगातील सर्वात महागड्या अॅक्सेस्री फॅशन ब्रँड्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. या कंपनीचे कपडे, बॅगा, चपला सर्व काही अत्यंत महाग असते. त्यांची किंमत लाखांपासून कोट्वधींमध्ये असते. दीपिका याच कंपनीच्या फॅशन मोहिमेत सहभागी झाली आहे. यापूर्वी ही संधी सोफी टर्नर, एम्मा रॉबर्ट्स, ली सेयडौक्स, क्लो ग्रेस मोरेट्ज़, एलिसिया विकेंडर अनेक नामांकित हॉलिवूड अभिनेत्रींना मिळाली आहे. परंतु या यादीत स्वत:च्या नावाची नोंद करणारी दीपिका इतिहासातील पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे. यापूर्वी ही संधी कुठल्याच भारतीय अभिनेत्रीला मिळाली नव्हती.

अवश्य वाचा – आयुषमान खुरानाने केला बॉयफ्रेंडला किस; व्हिडीओ व्हायरल..

दीपिका पदुकोण हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. लूई विटॉन कुटुंबात सामिल झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठीत ब्रँडचा एक भाग होणे हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. अशा आशयाची कॉमेंट तिने या पोस्टवर लिहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 4:27 pm

Web Title: deepika padukone creates history to feature in a global louis vuitton campaign mppg 94
Next Stories
1 ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
2 अतुल गोगावले लवकरच दिसणार नव्या रुपात
3 या अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न
Just Now!
X