14 October 2019

News Flash

दीपिकाला पडला रणवीरचा विसर

सध्या दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण सतत जमेल त्या पद्धतीने आणि स्वत:च्या कृतीमधून समाजकार्याला हातभार लावत असते. १५ सप्टेंबर रोजी ‘लिव्ह लव लाफ’ फाऊंडेशनच्या लेक्चर सीरिज लॉन्चसाठी दीपिका दिल्लीला पोहोचली होती. दरम्यान तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दलही वक्तव्य केले आहे. तिने तिच्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात मुलगी, बहिण आणि अभिनेत्री अशा सर्वच भूमिका साकारल्या असल्याचे सांगितेल. मात्र रणवीरची पत्नी असल्याचे सांगायला ती विसरली. सध्या दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या लोकांसाठी दीपिकाने ‘लिव्ह लव लाफ’ फाऊंडेशनची २०१५ मध्ये स्थापना केली. या फाऊंडेशनच्या नव्या लेक्चर सीरिज लॉन्चसाठी दीपिका आई, वडिल आणि बहिणीसोबत रविवारी दिल्लीला पोहोचली. लोकांच्या मानसिक त्रासाबद्दल वक्तव्य करताना तिने तिच्या आयुष्यात साकारलेल्या भूमिकांबद्दलदेखील खुलासा केला. ‘मी एक मुलगी, बहिण आणि अभिनेत्री आहे’ असे दीपिका म्हणाली. त्यानंतर कोणीतरी मागून दीपिकाला ती एक पत्नी असल्याची आठवण करुन दिली.

त्यावर दीपिकाने ती बोलत असलेलो वाक्य हसत पूर्ण केले आणि म्हणाली ‘अरे हा मी एक पत्नीदेखील आहे, मी विसरलेच होते.’ सध्या दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या इवेंटसाठी दीपिका तिची बहिण अनीशा, वडिल प्रकाश पदुकोण आणि आई उजाला उपस्थित होते.

दीपिका लवकरच ’83’ चित्रपटात रणवीर सिंगसह झळकणार आहे. लग्नानंतरचा दीपिका आणि रणवीरचा हा पहिला एकत्र चित्रपट असणार आहे. त्यामुळे त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यानंतर दीपिका मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. हा चित्रपट दिल्लीमध्ये अॅसिड हल्याने पिडीत लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. दीपिका चित्रपटात लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे.

 

First Published on September 17, 2019 10:38 am

Web Title: deepika padukone forget about her wife role while speaking in live love laugh foundation new lecture series launch avb 95