News Flash

रणवीरचे प्रताप पाहून दीपिका झाली नाराज

रणवीरच्या फोटोवर कमेंट करत दीपिकाने व्यक्त केली नाराजी

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो जास्त चर्चेत असतो. रेड कार्पेट असो वा फॅशन शो असो रणवीर नेहमीच चित्रविचित्र ढंगामध्ये हजर होतो. नुकताच रणवीरने ऐले पुरस्कार सोहळ्यासाठी खास ड्रेस डिझाइन करुन घेतला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. पण दीपिकाने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणवीरने ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट कपडे परिधान केले असून त्यावर काळ्या रंगाची टोपी घातली आहे. तसेच काळ्या रंगाची काठी हातात घेतली आहे. या लूकमध्ये रणवीर अत्यंत हॅन्डसम दिसत आहे. त्याच्या याच फोटोवर दीपिकाने ‘तुझा मेकअप करण्यासाठी माझी ब्रॉंजरची पूर्ण डबी संपवली आहेस. ती वापरण्याआधी मला एकदाही विचारे नाहीस’ असे म्हणत दीपिकाने नाराजी व्यक्त केली आहे. ब्रॉंजर हे स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनापैकी एक आहे.

 

View this post on Instagram

 

@loewe

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

काही दिवसांपूर्वी रणवीरने परिधान केलेल्या विचित्र अवतारामुळे चिमुकली घाबरुन रडू लागली होती. त्यावेळी रणवीरने लाल रंगाचा लॉंग हूडी परिधान केला असून काळा गॉगल लावला होता. त्याचा हा अतरंगी अवतार पाहून चिमुकली घाबरली आणि वडिलांना बिलगूल रडू लागली होती.

आणखी वाचा : Video : रणवीर सिंगचा आवतार पाहून चिमुकली लागली रडायला

आयफा अवॉर्ड २०१९च्या रेड कार्पेटवर रणवीर आणि दीपिकाने परिधान केलेल्या कपड्यांच्याही जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आयफासाठी रणवीरने निळसर रंगाचा आऊटफिट परिधान केला असून त्यावर काळ्या रंगाची काठी हातात घेतली होती. त्याच्या या लूकची तुलना नेटकऱ्यांनी ‘भूलभुलैया’ चित्रपटातील राज पाल यादवच्या पात्रशी करत खिल्ली उडवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 11:08 am

Web Title: deepika padukone get angry on ranveer singh action avb 95
Next Stories
1 सेम टू सेम! भाऊ कदमसोबत असलेल्या ‘या’ व्यक्तीला ओळखलंत का?
2 VIDEO: ‘नक्की शेण खातंय कोण?’; राजकारण्यांवर भरत जाधव संतापला
3 मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर मागील १० वर्षांपासून गायब आहे ही अभिनेत्री
Just Now!
X