बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या स्टारडम आणि लक्झरी लाइफस्टाइलची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगते. यात खासकरुन अभिनेत्रींचे कपडे, त्यांच्या बॅग्स या विशेष चर्चिल्या जातात. सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या काळ्या रंगाच्या बॅगची. दीपिकाने घेतलेली बॅग दिसायला अत्यंत साधी असली तरीदेखील त्याची किंमत ही साधीसुधी नसून चक्क लाखांच्या घरात आहे.
अलिकडेच दीपिकाला गेटवे ऑफ इंडिया येथे स्पॉट करण्यात आलं होतं. तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती अलिबागला जात होती. यावेळी तिच्या लूकसोबतच तिची बॅग विशेष चर्चिली गेली. दीपिकाने Louis Vuitton OnTheGo GM ही बॅग कॅरी केली होती. विशेष म्हणजे या बॅगची किंमत लाखोंच्या घरात आहे.

दीपिकाने कॅरी केलेल्या बॅगची किंमत तब्बल २ लाख ४७ हजार ५४३ रुपये असल्याचं सांगण्यात येतं. खरं तर दीपिकाला बॅग्सची विशेष आवड असून यापूर्वीदेखील तिच्या अशाच महागड्या बॅग्स चर्चेत आल्या आहेत.
दरम्यान, आगामी चित्रपटात दीपिका अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाविषयी किंवा त्याच्या नावाची कोणतीही अधिकृतरित्या माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.