संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमा येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर पद्मावत सिनेमाला गुजरातसह हरयाणामध्येही बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पद्मावत गुजरातमध्ये प्रदर्शित होणार नसल्याचे सांगितले. आता हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनीही हरयाणामध्ये सिनेमा प्रदर्शित होणार नसल्याचे सांगितले.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अनिल विज म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, सेन्सॉर बोर्डाकडून जो निर्णय येईल त्यावर पुढचा निर्णय अवलंबून होता. बैठकीत मी कायदा व सुव्यवस्थेला लक्षात घेऊन सिनेमावर बंदी घालण्यास यावी असे सांगितले. मंत्रीमंडळाने यावर विचार करुन सहमती दर्शवली. त्यामुळे हरयाणामध्ये पद्मावत हा सिनेमा प्रदर्शित होणार नाही.

यानंतर एएनआयने एक ट्विट करत म्हटले की, अजूनही करणी सेनेचे या सिनेमाविरोधात प्रदर्शन सुरू आहे लोकेंद्र सिंह कलवी यांनी सांगितले की, त्यांच्यासाठी देशाहून मोठं असं काहीच नाही. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला हिरवा कंदील दिला असला तरी राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात पद्मावतला बंदी घातल्यानंतर आता हरयाणामध्येही बंदी घालण्यात आला आहे.