27 February 2021

News Flash

प्रियांका-निकच्या नात्याबद्दल दीपिका म्हणते…

'मला निकबद्दल कल्पना नाही पण प्रियांकाला मी थोड्याफार प्रमाणात ओळखते'

प्रियांका आणि दीपिका या एकमेकांच्या मैत्रीणी नसल्या तरी त्यांच्यातलं नातं हे बॉलिवूडमधल्या इतर अभिनेत्रींसारखंही नाहिये. रणवीर सिंग या दुव्यानं त्या एकमेकींशी जोडल्या गेल्या. रणवीर आणि प्रियांकात घट्ट मैत्रीचं नातं आहे म्हणूनच आपल्या साखरपुड्याला ज्या मोजक्याच लोकांना तिनं आमंत्रण दिलं होतं त्यात रणवीरही होता. रणवीर आणि दीपिकासोबत प्रियांकानं रुपेरी पडद्यावर काम केलं आहे. २०१५ साली आलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातून या दोघींही एकत्र झळकल्या.

नुकत्याच या दोघीही विवाहबंधनात अडकल्या. दीपिकानं नोव्हेंबर महिन्यात लग्न केलं तर प्रियांकानं डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला लग्न केलं. दीपिका रणवीरच्या रिसेप्शन पार्टीसाठी उपस्थित राहणं प्रियांकाला शक्य झालं नाही मात्र प्रियांकानं मुंबईत आयोजित केलेल्या पार्टीत दीपिका रणवीरनं आवर्जुन हजेरी लावली. इतकंच नाही तर प्रियांकासमवेत दीपिकानं पिंगा गाण्यावर ठेकाही धरला. प्रियांका आणि निक जोनास यांच्या रिसेप्शन पार्टीत उपस्थित राहिलेल्या दीपिकानं पहिल्यांदाच या दोघांच्या नात्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘तिला नात्यात स्थैर्य हवं होतं. मला निकबद्दल कल्पना नाही पण आता तिला नात्यातलं ते स्थैर्य गवसलं आहे. मी तिला थोड्याफार प्रमाणात ओळखते. प्रेम, स्वत:च्या हक्काचं माणूस या साऱ्या गोष्टी तिच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तिला या सर्व गोष्टी हव्या होत्या आणि आता तिला ते सर्व मिळालं आहे. तिच्यासाठी नात्यातला हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता कारण तिनं बरेच चढ उतार पाहिले आहेत.’ असं म्हणत दीपिकानं आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रियांका आणि निक यादोघांच्या वयामध्ये १० वर्षांचं अंतर आहे. २०१७ पासून ते एकमेकांना डेट करत होते. १ आणि २ डिसेंबर रोजी ख्रिश्चन आणि पारंपरिक भारतीय पद्धतीनं हे दोघंही विवाहबंधनात अडकले. जोधपूरमधल्या उमेद भवन पॅलेसमध्ये दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 3:50 pm

Web Title: deepika padukone on priyanka chopra nick jonas marriage
Next Stories
1 विवेक ओबेरॉय साकारणार पंतप्रधान मोदींची भूमिका?
2 होकार देण्यापूर्वी दीपिकानं रणवीरसमोर ठेवली होती ही सर्वात मोठी अट
3 Simmba Box Office Collection : ‘सिम्बा’ची परदेशातही छप्पर फाड के कमाई !
Just Now!
X