22 January 2021

News Flash

Photos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना

इटलीतील लेक कोमो या ठिकाणी हा भव्य विवाहसोहळा पार पडणार आहे.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

बॉलिवूडमधील बहुचर्चित लग्न येत्या आठवड्यात पार पडणार आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लग्नसोहळ्यासाठी इटलीला रवाना झाले आहेत. विमानतळावरील या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी रणवीरसोबत त्याचे काही कुटुंबीयसुद्धा होते.

विमानतळावर रणवीर- दीपिकाला पाहण्यासाठी चाहत्यांचा गराडा होता. यावेळी रणवीरने काही चाहत्यांसोबत सेल्फी काढत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. येत्या १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. इटलीतील लेक कोमो या ठिकाणी हा भव्य विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये आणि १ डिसेंबर रोजी मुंबईत स्वागतसमारंभाचं आयोजन करण्यात येईल. इटलीत विवाहसोहळ्याला कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित राहणार असल्याने मुंबईतील स्वागत समारंभ खास बॉलिवूडमधल्या कलाकारांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.

वाचा : ‘बाहुबली’ प्रीक्वल वेब सीरिजमध्ये शिवगामीच्या भूमिकेत ही मराठमोळी अभिनेत्री

गेल्या आठवड्यात लग्नाआधीचे विधी आणि अन्य कार्यक्रम पार पडले. दीपिका नुकतीच नंदी पूजेसाठी बंगळुरुला तिच्या घरी गेली होती. १४ नोव्हेंबरला दोघे पारंपारिक कोकणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. दीपिका कर्नाटकातील सारस्वत ब्राह्मण असून कोकणी तिची मातृभाषा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 9:55 am

Web Title: deepika padukone ranveer singh are all smiles as they fly to italy for wedding see pictures
Next Stories
1 ‘बाहुबली’ प्रीक्वल वेब सीरिजमध्ये शिवगामीची भूमिका साकारणार ही मराठमोळी अभिनेत्री
2 ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइमटाइम द्या, अन्यथा खळ्ळ खटॅक: मनसेचा इशारा
3 चित्र रंजन : एका झंझावाताची सुरेख ‘लय’कथा
Just Now!
X