अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच ‘छपाक’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे दीपिका सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सेलिब्रिटींना अनेक वेळा चित्रपटासोबतच त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयीही प्रश्न विचारण्यात येतात. असाच एक प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला. ज्याचं दीपिकाने सडेतोड उत्तर दिलं.

चित्रपटाचं प्रमोशन सुरु असताना एका व्यक्तीने दीपिकाला तिच्या प्रेग्नंसीविषयी काही प्रश्न विचारले. हा प्रश्न विचारल्यानंतर दीपिका थोडीशी नाराज होत तिने स्पष्टपणे प्रतिप्रश्न केला. “मी प्रेग्नेंट दिसते का? जेव्हा मी फॅमिली प्लानिंग करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच विचारेन. जर तुम्ही परवानगी दिली तर मी प्लानिंग करेन. तसंच जर मी प्रेग्नंट असेन तर ९ महिन्यांनंतर सगळ्यांनाच समजेल”, असं सडेतोड उत्तर दिपिकाने दिलं.


वाचा : Photo : ‘मलंग’साठी अमृताची कसरत; केलं इतकं किलो वजन कमी

यापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्येदेखील दीपिका प्रेग्नंसीविषयी मोकळेपणाने बोलली होती. “मला आणि रणवीरला फॅमिली प्लानिंग करण्याची घाई नाहीये. सध्या आम्ही दोघांनी आमचं लक्ष करिअरवर केंद्रित केलं आहे”.दरम्यान, दीपिकाची मुख्य भूमिका असलेला ‘छपाक’ हा चित्रपट लक्ष्मी अगरवालच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजारने केलं आहे.