07 July 2020

News Flash

दीपिकाने शेअर केला रणबीरसोबतचा फोटो; पती रणवीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

रणवीरने कोणती प्रतिक्रिया दिली असेल?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. २०१८ मध्ये या जोडीने इटलीतील लेक कोमा येथे लग्नगाठ बांधली. बऱ्याचदा हे दोघं एकमेकांप्रती असलेलं प्रेम आणि आदर यामुळे चर्चेत येत असतात. मात्र यावेळी चाहत्यांमध्ये दीपिका,रणवीर आणि रणबीर या तिघांची चर्चा रंगली आहे. दीपिकाने अभिनेता रणबीर कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला असून त्यावर रणवीर सिंगने कमेंट केली आहे. त्यामुळे या फोटोची आणि रणवीरच्या कमेंटची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय.

रणवीर सिंगसोबत लग्न करण्यापूर्वी दीपिका आणि रणबीरचं अफेअर होतं हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र काही कारणास्तव या दोघांचा ब्रेकअप झाला. परंतु आजही हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत. बऱ्याच वेळा या दोघांमधील मैत्रीचा प्रत्यय अनेकांना आला आहे. त्यातच दीपिकाने रणबीरसोबतच्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटो अनेकांचं लक्ष वेधत आहे.

‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटामध्ये दीपिका आणि रणबीरने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या पहिल्या लूक टेस्टचा फोटो दीपिकाने शेअर केला आहे. तसंच तिने या चित्रपटातील ‘यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है..एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे- नैना तलवार।’, हा डायलॉग कॅप्शनमध्ये दिला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर रणवीर सिंगने त्यावर ‘क्युट’ अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, रणवीरची ही कमेंट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र त्याची खिल्ली उडवली आहे. विशेष म्हणजे काही नेटकऱ्यांनी, रणबीर-दीपिकाचा असा एकत्र फोटो पाहून तुला राग आला नाही का असेही प्रश्न विचारले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 9:09 am

Web Title: deepika padukone share photo with ranbir kapoor actor here is husband ranveer singh reaction ssj 93
Next Stories
1 देवा मला आणखी एकदा लग्न करायचं, तीन लग्नांनंतर चौथ्या लग्नासाठी अभिनेत्रीची देवाकडे विनंती
2 गश्मीरचे वेब विश्वात पदार्पण, लवकरच दिसणार या वेब सीरिजमध्ये
3 ‘या’ कलाकारांनी टाकला चिनी वस्तूंवर बहिष्कार
Just Now!
X