दीपिका पदुकोणने आपल्या कान महोत्सवाच्या प्रवासाला सुरूवात केला आहे. या महोत्सवातले दीपिकाचे फोटो आता व्हायरलही व्हायला सुरूवात झाली आहे. दीपिकाचे हे फोटो पाहून तिचा रेड कार्पेटवरचा जलवा पाहायला आता तिचे चाहते उत्सुक झाले आहेत. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे कान महोत्सवाच्या पूर्व तयारीचे फोटो शेअर केले आहेत. आता तिच्या चाहत्यांनीही तिचे कान महोत्सवातले फोटो शेअर केले आहेत. दीपिकाने हा लाल ड्रेस कान महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या पत्रकार परिषदेत घातला होता. एका सौंदर्य प्रसाधन कंपनीची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून दीपिका पहिल्यांदा कान महोत्सवात गेली आहे. कान महोत्सवर १७ मे ते २८ मेपर्यंत सुरु असणार आहे.

https://www.instagram.com/p/BUMbiNvhPz3/

https://www.instagram.com/p/BUL77BzhZb3/

https://www.instagram.com/p/BUL7QPzFdRb/

https://www.instagram.com/p/BUMmV9WFXg9/

https://www.instagram.com/p/BUL_txVFuTB/

https://www.instagram.com/p/BULzrjrlnk-/

https://www.instagram.com/p/BULyyjKFAEK/

यंदाच्या कान महोत्सवात ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचाही अप्रत्यक्ष सहभाग आहे. कारण, तिची निर्मिती असलेल्या ‘पहुना’ (Pahuna) या सिक्कीममधील सिनेमाचा ट्रेलरही कानमध्ये दाखवण्यात येणार आहे. त्याशिवाय ख्यातनाम भारतीय शेफ विकास खन्नाच्या ‘बरीड सिड्स’चा (Buried Seeds) ट्रेलरही या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. रिमा दास यांचा ‘व्हिलेज रॉकस्टार्स’चाही यामध्ये समावेश आहे.