News Flash

Video: डान्स करताना स्टेजवर पडली ही टीव्ही अभिनेत्री

सरस्वती पूजेच्या दिवशी स्टेजवर परफॉर्म करत असताना ती अचानक पडली

दीपिका सिंग

‘दीया और बाती हम’ मालिकेतील संध्या बींदणी अर्थात दीपिका सिंग मुल झाल्यानंतर कोणत्याही मालिकेत दिसली नाही. पण गरोदरपणात तिने शास्त्रीय नृत्याची आराधना करणं सोडलं नाही. नुकताच तिने एक डान्स करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. दीपिका ओडिसी डान्सर आहे. सरस्वती पूजेच्या दिवशी स्टेजवर परफॉर्म करत असताना ती अचानक पडली. पण पडल्यानंतर ती पुन्हा त्याच जोमाने उभी राहिली आणि डान्स करु लागली. पडल्यानंतर उठून पुन्हा जोमाने कामाला लागा… असाच काहीसा मेसेज ती या व्हिडिओमधून आपल्या चाहत्यांना देत असेल यात काही शंका नाही. दीपिका सोशल मीडियावर अनेकदा तिचे ओडिसी डान्स करतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

गेल्या वर्षी २० मे रोजी तिने मुलाला जन्म दिला. दीपिकाचा पती रोहित राज गोएलने त्यांच्या पहिल्याच बाळाच्या आगमनाची बातमी दिली होती. मुलाचे नाव तिने सोहम असे ठेवले. सोहमच्या जन्मावेळी तिचे वजनही वाढले होते. आता ती डान्ससोबत जिमही करत आहे.आपल्या गरोबदरपणाबद्दल सांगताना दीपिका म्हणाली होती की, ‘मी सुट्टीसाठी बाहेरगावी गेले होते तेव्हा मी आजारी पडले. तेथून परतल्यानंतर लगेच मी डॉक्टरांची भेट घेतली. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला या गोड बातमीबद्दल सांगितले. माझे आई-वडील, सासू-सासरे आणि नवरा हे यामुळे खूप आनंदी आहेत. बाळाला जन्म देणं हा प्रत्येक स्त्रीसाठी एक सुंदर अनुभव असतो. माझे कुटुंब काही गोष्टींमध्ये अंधश्रद्धाळू असल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आम्ही ही बातमी कोणलाच सांगितली नाही. मी त्यांच्या भावना समजू शकते. रोहित आणि मी आतुरतेने त्या क्षणाची वाट पाहत आहोत.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 3:47 pm

Web Title: deepika singh sandhya diya aur baati hum fell stage dance video
Next Stories
1 दीपिकाच्या न होऊ शकलेल्या सासु- सासऱ्यांनी तिला दिले खास गिफ्ट
2 ‘जाट समाजानंतर राजपूत देश जाळत आहेत, पण फक्त मुस्लिमांना देशद्रोही म्हटलं जातं’
3 रोझ मॅक्गोवनचा एकतर्फी लढा
Just Now!
X