डेलनाज इरानी ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकेल्या या अष्टपैलू अभिनेत्रीला कधीही मनासारखं काम मिळालं नाही, अशी तक्रार तिने केली. एखादी भूमिका हिट झाली की तुम्हाला तशाच प्रकारच्या कामांसाठी विचारलं जातं दुसऱ्या कुठल्याही भूमिकांसाठी तुमचा विचारसुद्धा केला जात नाही, अशी खंत तिने व्यक्त केली आहे.

अवश्य पाहा – याला म्हणतात खरा सुपरस्टार; चित्रपटातून केलं बाहेर पण एका सीनसाठी घेतले ७४ कोटी

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत डेलनाजने आपल्या करिअरवर भाष्य केलं. “आपल्या इंडस्ट्रीमधील अनेक निर्माते चौकटीत राहूनच विचार करतात. एखाद्या कलाकाराची एखादी भूमिका गाजली की त्याला त्याच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारलं जातं. करिअरच्या सुरुवातीस मी सहाय्यक कलाकारांच्या भूमिकेत झळकले होते. तेव्हापासून आजतागायत मला एकाही दिग्दर्शकानं मुख्य अभिनेत्रीचा रोल देऊ केलेला नाही. मी अनेक ठिकाणी ऑडिशन्स दिल्या पण माझ्या माथ्यावर जणू सहाय्यक अभिनेत्रीचाच स्टँप मारला होता. काही दिग्दर्शकांच्या मते माझ्याकडे मुख्य अभिनेत्रीचा चेहरा नाही. मुख्य अभिनेत्रीचा चेहरा कसा दिसतो? हे अद्याप मी पाहिलेलं नाही.” अशी खंत डेलनाजनं या मुलाखतीत व्यक्त केली.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

डेलनाज इरानी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. १९९९ साली ‘सीआडी’ या मालिकेतून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘येस बॉस’, ‘हम सब बाराती’, ‘सोन परी’, ‘शरारत’, ‘क्या मस्त है लाईफ’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं. शिवाय ‘कल हो ना हो’, ‘भूतनाथ’, ‘रावन’, ‘क्या सूपर कूल है हम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. गेली दोन दशकं ती अभिनयसृष्टीत कार्यरत आहे. पण तिला अद्याप मुख्य अभिनेत्रीचा रोल मिळाला नाही याची खंत तिच्या मनात आहे.