‘फ्रेशर्स’, ‘बनमस्का’, ‘लव्ह लग्न लोचा’ यांसारख्या युथफुल मालिकांनी ‘झी युवा’ वाहिनीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. एवढंच नाही, तर ‘युवा सिंगर एक नंबर’, ‘संगीत सम्राट’, ‘युवा डान्सिंग क्वीन’सारखे कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा ‘झी युवा’वर पाहायला मिळतात. अशा दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी असणारी ही वाहिनी अत्यंत लोकप्रिय झालेली आहे. या सर्वांच्या लाडक्या वाहिनीवर आता एक डॉन अवतरणार आहे. ‘डॉक्टर डॉन’ ही नवी मालिका लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे.

मालिकेचं नाव ‘डॉक्टर डॉन’ असलं, तरी या मालिकेचं स्वरूप मात्र विनोदी असणार आहे. पौराणिक मालिकेत खंडेरायाच्या भूमिकेत दिसलेले देवदत्त नागे हे या मालिकेत थेट डॉनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. एका डॉनचं आयुष्य, त्याच्या भोवतालची परिस्थिती, जवळच्या माणसांशी त्याचे असलेले संबंध, त्यांच्यासोबत राहण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड यावर ही मालिका आधारित असणार आहे. अभिनेता देवदत्त नागे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. २ वर्षानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अवतरत असलेल्या देवदत्तला, मालिकेतील त्याच्या लूकसाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे.

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

आणखी वाचा : “‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये सोहम साकारल्यापासून शेजारचे माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले”

खंडेरायाच्या भूमिकेत दिसलेल्या देवदत्तसाठी, विनोदी मालिकेतील डॉनचे पात्र साकारणे नक्कीच आव्हानात्मक असेल. याविषयी बोलताना तो म्हणतो, “विनोदी प्रकारात मी कधीच काम केलेलं नाही. त्यामुळे या रोलसाठी मला विचारलं याचा आनंद झाला होता. या मालिकेत मला डॉनचं काम करावं लागणार आहे. त्यातच एक विनोदी छटासुद्धा जपावी लागणार आहे. त्यामुळेच माझ्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक असणार आहे. मला नवनवीन प्रकारच्या भूमिकांचं आव्हान पेलायला खूप आवडतं. विनोदी मालिका, हे आव्हान माझ्यासाठी खूपच छान असेल. मला डॉनच्या भूमिकेत पाहायला माझ्या चाहत्यांना सुद्धा खूपच आवडेल यात काहीच शंका नाही. ही नवी मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरेल याची खात्री वाटते.”