28 November 2020

News Flash

काय आहे देवदत्त नागेचे ‘ग्रीन वर्कआऊट’? जाणून घ्या

त्याने यासंबंधी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता देवदत्त नागे हा उत्तम अभिनयासोबतच त्याच्या फिटनेससाठी सुद्धा चर्चेत असतो. डॉक्टर डॉन या मालिकेतील त्याच्या देवा या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील भूमिकेसाठी देवा त्याच्या फिटनेसकडे अजून कटाक्षाने लक्ष देत आहे.

डॉक्टर डॉन मालिकेचं चित्रीकरण कर्जतमध्ये सुरु आहे त्यामुळे मालिकेची संपूर्ण टीम तिकडेच राहत आहेत आहेत. तिथे निसर्गाच्या सानिध्यात देवदत्त करत असलेल्या ग्रीन वर्कआउटची बरीच चर्चा झाली. वर्कआउटसोबतच महत्वाचं असतं ते म्हणजे योग्य डाएट. देवदत्तचा सकस आहाराकडे देखील तितकाच कल आहे.

परिपूर्ण व्यायामानंतर योग्य प्रोटीन शरीराला मिळावं म्हणून देवदत्तने सेटवर स्वतः चिकन बनवतो. तसा फोटो देखील देवदत्तने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि चिकन हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे असं देखील त्याने त्यात म्हंटल आहे. देवदत्ताचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मालिकेद्वारे तो रोज प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतोच पण त्याच्या फिटनेसबद्दल गोष्टी शेअर करून तो अनेकांना प्रोत्साहित देखील करतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 5:39 pm

Web Title: devdutta nage green workout avb 95
Next Stories
1 अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर; सहा महिन्यात १ कोटी लोक करु लागले फॉलो
2 पुढच्या वर्षी सुरु होणार अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे चित्रीकरण
3 ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्रींच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळली
Just Now!
X