सोनी टेलीव्हिजनवर सुरू असलेली ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही मालिका सध्या लोकांचे लक्ष वेधून घेते आहे. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या या मालिके साठी मराठमोळा संगीतकार देवेंद्र भोमे याने संगीत दिले आहे. देवेंद्र गेली दहा वर्ष हिंदी-मराठी मालिका आणि चित्रपट विश्वात संगीतकार म्हणून कार्यरत आहे. देवेंद्रने याआधी ‘मेरे साई’ या मालिकेसाठीही संगीत दिले असून ‘केबीसी’च्या अकराव्या पर्वाची अंतिम फे री, ‘पटियाला बेब्स’, ‘महाबली हनुमान’, सोनी मराठी वाहिनीवरील ‘गर्जा महाराष्ट्र’सारख्या मालिका आणि शोजसाठीही संगीतकार म्हणून काम पाहिले आहे. मात्र संगीतकार म्हणून त्याच्या कामाची खरी पावती त्याला मिळाली ती ‘मेरे साई’ या मालिके मुळे… ऐतिहासिक किंवा पौराणिक मालिकांना संगीत देताना त्या काळातील गोष्टीचा आत्मा तोच ठेवत, आधुनिक काळाला अनुसरून संगीताचा विचार करावा लागतो, असे देवेंद्र सांगतो. ‘मेरे साई’ या मालिकेला दिलेले संगीत लोकांच्या खूप पसंतीस उतरले. हे संगीत आवडल्याबद्दल के वळ देशभरातूनच नव्हे तर १८ देशांमधून लोकांनी निर्मात्यांना फोन करून कळवले होते. याच मालिके च्या शीर्षकगीतासाठी खुद्द पंडित जसराज यांनी देवेंद्र आणि शीर्षकगीत गाणारा जयदीप वैद्य यांना प्रत्यक्ष भेटायला बोलवून त्यांना शाबासकी दिली.  ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिके च्या निमित्ताने अहिल्याबाई होळकरांची कथा जगासमोर येते आहे. अहिल्याबाईंना मानणारे लोक के वळ देशातच नाही तर जगभरात आहेत. त्यामुळे या मालिके ला संगीत देताना त्यांच्यावर असलेल्या लोकांच्या प्रेमाचीही जाणीव मनात होती, असे देवेंद्रने सांगितले. मल्हारराव होळकर हे धनगर समाजातील होते. त्यामुळे या मालिके ला संगीत देताना धनगर समाजाचे लोकसंगीत आहे त्याचाही अभ्यास के ल्याचे त्याने सांगितले.