04 March 2021

News Flash

Video : “तुला कारागृहात पाठवेन”; दिव्या भटनागरच्या पतीवर ‘गोपी बहु’चे गंभीर आरोप

'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं निधन झालं.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं करोनामुळे निधन झालं. दिव्याच्या निधनामुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दिव्याची मैत्रिण व अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दिव्याच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

“एकदा नात्यात फसवणूक झाली की दुसऱ्यांदा चूक करण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यावेळी जो कोणी व्यक्ती खांदा देतो त्याच्यासोबत मुली पुन्हा नातं जोडतात. दिव्या खूपच निरागस होती. मी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता. मी तिचा पती गगन गब्रूबद्दल बोलतेय. त्या व्यक्तीने दिव्याचा शारीरिक व मानसिक छळ केला. दिव्याने स्वीकारावं यासाठी त्याने विनवणी केली आणि तिच्या या निर्णयामुळे मी चार वर्षे तिच्यापासून लांब होते”, असं देवोलिना या व्हिडीओत म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

दिव्या आणि गगन यांनी २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली. शिमलामध्ये गगनविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो जामिनावर सुटल्याचा खुलासाही देवोलिनाने केला. “तू पुन्हा कारागृहात जाशील. कारण तू दिव्याचा अतोनात छळ केलास. देव तुला कधीच माफ करणार नाही”, असं ती म्हणाली.

दिव्याला करोना व न्युमोनिया यांचं निदान झालं होतं. गेल्या आठवड्यापासून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र सोमवारी तिने अखेरचा श्वास घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 10:14 am

Web Title: devoleena bhattacharjee accuses late friend divya bhatnagar husband of domestic violence threatens to expose him ssv 92
Next Stories
1 Video : आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी तयार केलं जेवण; शेतकरी आंदोलनात रुपिंदर हांडाचा सहभाग
2 आदित्य नारायणने पत्नीसाठी खरेदी केला ५ बीएचके फ्लॅट
3 …म्हणून एका रात्रीतून मुंबईमधून शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर आले होते उतरवण्यात
Just Now!
X