News Flash

“मला राग येतोय…”; बिग बॉसच्या निर्णयावर देवोलिना संतापली

'आपला खोडकर मेंदू चालवणं थांबवा, अन्यथा...'; अभिनेत्रीनं बिग बॉसला दिला इशारा

बिग बॉस हा लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. हा रिअॅलिटी शो सुरु होऊन आता पाच आठवडे उलटून गेले आहेत. परिणामी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी एक-दोन स्पर्धक घरातून एलिमिनेट होऊ लागले आहेत. या आठवड्यात शार्दूल पंडित शोमधून बाहेर पडला. लक्षवेधी बाब म्हणजे नॉमिनेशन राऊंडमध्ये त्याच्यासोबत रुबिना दिलैक देखील होती. दोघांनाही एकसमान वोट मिळाले होते. तरी देखील बिग बॉसने शार्दूलला घरातून एलिमिनेट केलं. मेकर्सच्या या निर्णयावर अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य नाराज आहे. बिग बॉसने प्रामाणिकपणे खेळ निर्णय घ्यावा, काही ठराविक स्पर्धकांना पाठिंबा देऊ नये असं म्हणत तिने बिग बॉसवर निशाणा साधला आहे.

अवश्य पाहा – ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? दिग्दर्शकाने सांगितला अजब किस्सा

अवश्य पाहा – १७ व्या वर्षी झाली होती मिस इंडिया; बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या काय करतेय?

अवश्य पाहा – ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर महेश टिळेकरांची टीका

देवोलिना बिग बॉसची माजी स्पर्धक आहे. १३ व्या सीझनमध्ये ती झळकली होती. या पार्श्वभूमीवर तिने शार्दूलचं नाव घेत बिग बॉसवर भाष्य केलं. “रुबीना आणि शार्दूलला एकसारखेच वोट मिळाले होते. जसे गेल्या सीझनमध्ये मला आणि रश्मीला मिळाले होते. बिग बॉस असे निर्णय घेणं आता थांबवा. अन्यथा मला राग येईल. खूप चांगला खेळ सुरु होता. आपला खोडकर मेंदू चालवणं कृपया थांबवा. कधीही विसरु नका बिग बॉसमधील खरी क्वीन मीच आहे. त्यामुळे या राणीला राग येईल असं काही करु नका.” अशा आशयाचं ट्विट करुन देवोलिनाने मेकर्सवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 1:57 pm

Web Title: devoleena bhattacharjee on bigg boss 14 mppg 94
Next Stories
1 ‘सांग तू आहेस का’; सिद्धार्थ चांदेकरच्या नव्या मालिकेची उत्सुकता
2 “अल्ट बालाजी पॉर्न तयार करत नाही”; अभिनेत्याचा एकता कपूरला पाठिंबा
3 बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाणं का टाळतोस? अक्षय कुमार म्हणाला…
Just Now!
X