News Flash

या वयातही फिट राहण्यासाठी धर्मेंद्र करतायेत वर्कआऊट, पाहा व्हिडीओ

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

८० च्या दशकात एकाहून एक सुपरहिट चित्रपट करणारे अभिनेते धर्मेंद्र सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. ते त्यांचा संपूर्ण वेळ फार्महाऊसवर घालवताना दिसतायेत. तसेच तेथे अनेक वेगवेगळ्या गोष्टी करतानाचे व्हिडीओ आणि फोटो ते सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सध्या धर्मेंद्र यांचा एक वर्कआऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

धर्मेंद्र यांनी ट्विटर अकाऊंटवर वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते सुरुवातीला त्यांचा फार्महाऊस दाखवत आहेत. त्यानंतर ते त्यांच्या खोलीमध्ये वर्कआऊट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी छान असे कॅप्शन देखील दिले आहे. त्यांचा या वयातील वर्कआऊट व्हिडीओपाहून चाहते फिदा झाले आहेत.

यापूर्वी धर्मेंद्र यांनी त्यांचा बंगल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये बंगल्यामध्ये मोठे गार्डन, कारंजे आणि गार्डनमध्ये काही मुर्ती बसविल्याचे दिसत होते. हे सारे पाहिल्यानंतर त्यांनी बंगल्याच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केल्याचे म्हटले जात होते. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी “हे सारं त्याने दिलं आहे आणि एक दिवस तो गपचूप सारं काही घेऊन जाईल. आयुष्य फार सुंदर आहे मित्रांनो, आयुष्य मजेत आणि भरभरुन जगा” असे कॅप्शन दिले होते.

धर्मेंद्र यांनी १९६० साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ असे त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते. त्यानंतर त्यांनी ‘सत्यकाम’, ‘खामोशी’, ‘शोले’, ‘क्रोधी’, ‘यादों की बारात’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘यमला पगला दिवाना फिर से’ हा त्यांचा बॉलिवूडमधील शेवटचा चित्रपट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 3:55 pm

Web Title: dharmendra excercise video viral on internet avb 95
Next Stories
1 …म्हणून ‘त्या’ आजीला मदत करणाऱ्यांवर दिग्दर्शक केदार शिंदे संतापले; म्हणाले,”लाज वाटायला हवी”
2 ए. आर. रेहमान यांच्या ‘इंडस्ट्रीमधील विरोधी गँग’ वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया
3 सुशांतसोबत काम करण्यासाठी कंगनाने दिला होता नकार, समोर आले कारण
Just Now!
X