19 January 2021

News Flash

Video: “मोदींच्या अंगणात मोर आला अन् आज माझ्या अंगणात लांडोर”

अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल...

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी धर्मेंद्र चक्क एका लांडोरमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या बागेत एक लांडोर आली आहे. “काल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोर आला होता, अन् आज माझ्याकडे आज लांडोर आली आहे”, असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

अवश्य पाहा – सासू-सुनेच्या भांडणावर रॅप साँग; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

अवश्य पाहा – बदला घ्यायला येतेय नवी ‘नागिन’; एकता कपूरने शेअर केले अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

“काय योगायोग आहे, काल मोदीजींच्या अंगणात मोराला नाचताना पाहिलं अन् आज माझ्या अंगणात लांडोर आली आहे. तिने मला धड व्हिडीओ देखील शूट करु दिला नाही. आली अणि लगेच उडून गेली.” अशा आशयाचं ट्विट करुन धर्मेंद्र यांनी लांडोरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 11:49 am

Web Title: dharmendra narendra modi peacock video mppg 94
Next Stories
1 अग्गंबाई सासूबाई : अभिजीतच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल मॅडी करणार खुलासा
2 कंगनाने शेअर केला ‘मणिकर्णिका’च्या सेटवरील तो फोटो; म्हणाली, ‘हा तर लक्ष्मीबाईंनी…’
3 मृत्यूनंतरही दिशा सालियनचा फोन सुरु होता? ; नेमकं काय आहे प्रकरण
Just Now!
X