News Flash

धर्मेंद्र यांनी सनी देओलला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाले…

धर्मेंद्र यांनी शेअर केला बर्थ डे सेलिब्रेशनचा खास फोटो

बॉलिवूडमध्ये ८०-९०चा काळ गाजवणारा अभिनेता म्हणजेच सनी देओल. ‘ये ढाई किलो का हाथ जब किसी पे पड़ता है न, तो आदमी उठता नहीं उठ जाता है’ या एका संवादामुळे अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सनी देओलने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. यामध्ये अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, या सगळ्यांमध्ये सनीचे वडील म्हणजेच अभिनेता धर्मेंद्र यांच्या शुभेच्छांकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं.

धर्मेंद्र यांनी सनी देओलच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून त्याला हटके कॅप्शन दिली आहे. या फोटोमध्ये धर्मेंद्र, सनी आणि त्याची मुलं दिसून येत आहे. देओल स्टाइलमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, सनी देओल बऱ्याच वेळा सोशल मीडियावर आईसोबत किंवा धर्मेंद्र यांच्यासोबत फोटो शेअर करत असतो. बॉलिवूडमध्ये एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे सनी देओल सध्या खासदार असून जनतेची सेवा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर धर्मेंद्र लॉकडाउनच्या काळात त्यांच्या फार्महाऊसवर शेती पिकवण्यात व्यस्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 5:38 pm

Web Title: dharmendra shared sunny deols 64th birthday celebration pictures in deol style dcp 98 ssj 93
Next Stories
1 ‘डीडीएलजे’मध्ये रोमॅण्टीक सीनसाठी शाहरुखने दिला होता नकार; कारण…
2 नोरा फतेहीचा नवा अल्बम प्रदर्शित, पाहा व्हिडीओ
3 ‘एक कॉल घरात मॉल’
Just Now!
X