करोना विषाणू आपल्या दुष्कर्माची फळं आहेत. सध्याच्या परिस्थीतून काहीतरी शिका आणि माणूसकीला जिवंत ठेवा अशी विनंती बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांनी केली आहे. देशभरात करोना विषाणूचे संक्रमण वाढतच चालले आहे. अगदी लॉकडाउचे आदेश जारी करुनही करोना विषाणू अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले धर्मेंद्र?

आज मनुष्य आपल्या दुष्कर्माची फळं भोगत आहे. हा करोना विषाणू दुसरं तिसरं काही नसून आपल्या दुष्कर्माचे फळं आहे. जर माणसाने माणूसकीवर प्रेम केलं असतं तर अशी वेळ आपल्यावर आली नसती. आज मी खुप दु:खी आहे. स्वत:साठी, मुलांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी. अजूनही वेळ गेलेली नाही सुधरा आणि माणूसकीला जिवंत ठेवा. अशा आशयाची विनंती धर्मेंद्र यांनी व्हिडीओव्दारे केली आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी त्यांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.