News Flash

ढोलकीच्या मंचावर आता स्टंटबाज, ठसकेबाज लावणीचा वेगळाच साज!

समृद्धी आणि धनिष्ठाने बर्फाच्या लादीवर नृत्य करण्याचे आव्हान अगदी सहजरीत्या पेलले.

ढोलकीच्या तालावर

ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमामध्ये स्पर्धक आपल्या लावण्यांमधून नेहमीच काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत या मोठ्या आणि छोट्या अप्सरांनी मिळून ठसकेबाज लावणीचे आव्हान उत्तमरीत्या पेलले. पण या आठवड्यात मात्र छोट्या अप्सरांपुढे खरोखरच मोठे आव्हान होते. पहिल्यांदाच ढोलकीच्या मंचावर लावण्यांमध्ये स्टंटचा वापर करण्याचे आव्हान देण्यात आले होते. हा स्टंट राउंड बघत असताना प्रेक्षक आणि परीक्षक यांना देखील कौतुक वाटत होते. कश्या काय या चिमुकल्या इतक्या सहजरीत्या आणि आत्मविश्वासाने हे आव्हान पेलत आहेत असा प्रश्न त्यांनाही पडला. ढोलकीच्या तालावरचा हा भाग तुम्ही ३ आणि ४ जुलैला रात्री ९.३० वा. कलर्स मराठी वाहिनीवर पाहू शकता.

वाचा : अजय देवगणमुळेच मी अजूनही अविवाहित- तब्बू

स्टंट राउन्ड भागाची सुरुवात देखील विशेष पद्धतीने झाली असे म्हणायला हरकत नाही. हेमंत ढोमेने भागाच्या सुरुवातीला या थीमला साजेशी अशी एण्ट्री केली. तो हार्नेस लावून आभाळातून मंचावर अवतरला. अंकिता आणि आर्याने मंकी बार्सचा उपयोग करून ही पोळी साजूक तुपातली या गाण्यावर लावणी सादर केली. तसेच एरियल इलास्टिक वापरून स्नेहल आणि तनयाने उत्तम लावणी सादर करून परीक्षकांची शाबासकी मिळवली. धनश्री आणि अनुष्काने ट्रॅक ट्रॉलीचा वापर करून नृत्य सादर केले. ट्रॅक ट्रॉलीचा वापर करून नृत्य करणे खूप अवघड आहे, त्यावर तोल सांभाळून, चेहऱ्यावरील हावभाव न बदलता आपल्या जोडीदाराबरोबर नृत्य करण्याचे आव्हान त्यांनी अगदी सहज पार केले.

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

विशेष म्हणजे समृद्धी आणि धनिष्ठाने बर्फाच्या लादीवर नृत्य करण्याचे आव्हान अगदी सहजरीत्या पेलले. त्यांनी राजसा जवळी जरा बसा या गाण्यावर लावणी सादर केली. बर्फाच्या लादीवर उभे राहणे हे किती कठीण असते याची कल्पना आपण करू शकतो. कारण बर्फ हातामध्ये पकडायचा म्हटल तरी ते खूप कठीण असते, पण या मुलींनी तब्बल ३ मिनिटे सलग त्या बर्फाच्या लादीचा वापर करून नृत्य केले हे खरचं कौतुकास्पद आहे. ही लावणी बघितल्यानंतर जितेंद्र जोशीला देखील बर्फाच्या लादीवर उभे रहाण्याचा अनुभव घ्यावासा वाटला. त्याने समृद्धी आणि धनिष्ठाच्या हिंमतीची दाद दिली.

dholkichya-talavar1

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:22 pm

Web Title: dholkichya talavar apsara will perform in stunt round
Next Stories
1 Afghan First Look: गाण्यानंतर आता अभिनयासाठी अदनान सामी सज्ज
2 ऐश्वर्याबद्दलची ‘ती’ वार्ता निव्वळ एक अफवा
3 अमिताभ, सलमान, आमिरला ऑस्करचे आमंत्रण, शाहरुखला वगळले
Just Now!
X