News Flash

डायना पेंटीने दीपिकासाठी लिहिली खास पोस्ट; म्हणते…

दीपिकाचा स्वभाव म्हणजे...

कलाविश्वातील प्रत्येक गोष्ट ही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. यात सेलिब्रिटींच्या लाइफस्टाइलपासून ते त्यांच्यातील वादांपर्यंत अनेक गोष्टी ऐकणं चाहत्यांचा आवडीचा विषय असतो. यात अनेक वेळा बॉलिवूड अभिनेत्रींमधील कॅटफाइट हादेखील चर्चेचा विषय असतो. त्यामुळे जर एकाच वेळी दोन लोकप्रिय अभिनेत्री यशाच्या शिखरावर असतील तर त्यांच्यातील वादाविषयी किंवा मैत्रीविषयी जाणून घ्यायला प्रेक्षक आतूर असतात. परंतु, सध्या चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री डायना पेंटीने अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी लिहिलेल्या खास पत्राची.

“दीपिका पदुकोणसोबतचा माझा पहिला चित्रपट होता. कॉकटेल या चित्रपटात मी तिची सहकलाकार होते. दीपिका एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम सहकारीदेखील आहे. त्यावेळी माझ्या मनात असणारी भीती तिने दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी एक मॉडेल होते आणि अचानकपणे अभिनय क्षेत्राकडे वळणं माझ्यासाठी फार नवीन होतं. मी एका लहान जागेतून एका विस्तीर्ण अशा ठिकाणी पदार्पण केलं होतं. तिथे मी कोणालाच नीट ओळखत नव्हते. त्यावेळी दीपिका आघाडीची अभिनेत्री होती.तर मी नवोदित अभिनेत्री होते. मात्र दीपिकाने कधी हा भेद जाणवू दिला नाही. ती कायम माझ्याशी आपुलकीने वागली”, असं डायना पेंटी म्हणाली.

पुढे ती म्हणते, “दीपिकाच्या चेहऱ्यावर कायम एक स्मित हास्य असतं. मला आजही चित्रपटाच्या चित्रीकरणाचा पहिला दिवस आठवतो. लंडनमधील हॉटेलच्या रुममध्ये मी एकटीच बसले होते. त्यावेळी मला दीपिकाने एक मेसेज पाठवला आणि मला जेवणाचं आमंत्रण दिलं. त्या रात्री मी जेवायला गेले. तेव्हा तिथे अन्यही काही लोक होते.विशेष म्हणजे या सगळ्यांनी मला त्यांच्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लवकरच माझी सगळ्यांशी छान मैत्री झाली आणि सेटवर दीपिका पदुकोणसोबत आणखी एक डिपी मिळाली. दीपिका कामाच्या बाबतीतही चोख आहे. ती कायम सेटवर लवकर येते आणि पॅकअप कधी होईल याची वाटही पाहत नाही. ती कितीही वेळ काम करु शकते. पण या सगळ्यात ती जीमला जाणं कधीच विसरत नाही”.

दरम्यान, होमी अदजानिया यांच्या कॉकटेल या चित्रपटात डायना पेंटीने दीपिका पदुकोण सोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट २०१२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 4:07 pm

Web Title: diana penty cocktail co star deepika padukone special post ssj 93
Next Stories
1 “जगाचा अंत होत आला तरी बिग बॉसमध्ये जाणार नाही”; अभिनेत्याने चर्चांवर दिला पूर्णविराम
2 कंगना रणौतच्या ‘या’ बॅगची किंमत वाचून तुमचे डोळे विस्फारतील!
3 फोटोतला ‘हा’ चिमुकला आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेता; बिग बींसोबत केलंय काम
Just Now!
X