News Flash

सुशांतपाठोपाठ आता रिया चक्रवर्तीच्या जीवनावर येणार चित्रपट?

चित्रपटासोबत डॉक्युमेंट्री आणि पुस्तक देखील येणार असल्याचे म्हटले जाते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती चर्चेत आहे. १४ जून रोजी सुशांतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआय, एनसीबी आणि ईडीकडू या प्रकरणी चौकशी सुरु आहे. अशातच रियावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक चित्रपट निर्माते सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर बायोपिक काढण्याचा विचार करत आहेत. तसेच तिच्या जीवनावर आधारित एक डॉक्युमेंट्री देखील तयार करण्यात येणार आहे. चित्रपट आणि डॉक्युमेंट्रीसोबतच एक पुस्तक प्रकाशन संस्था रियाच्या जीवनावर आधारित पुस्तक छापणार असल्याचे वृत्तामध्ये नमूद केले आहे.

यापूर्वी बॉलिवूड चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता सुशांतच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘Suicide or Murder?’ असे असून चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात सुशांत सारख्या मानसिकतेमधून गेलेल्या कलाकारांची देखील कथा दाखवण्यात येणार असल्याचे विजय यांनी म्हटले होते. आर. खानने देखील सुशांतवर बायोपिक काढण्यासंबंधी ट्विट केले होते. तसेच ट्विटमध्ये त्याने सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना या चित्रपटाद्वारे तो एक्सपोज करणार असल्याचे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 3:12 pm

Web Title: did filmmakers set to make a tell all biopic on late sushant singh rajput girlfriend rhea chakraborty avb 95
Next Stories
1 जॅकलीननं निळ्या साडीत धरला ताल अन् पाहता पाहता ‘गेंदा फूल’ झालं हिट
2 बॉलिवूड अभिनेत्री ड्रग्ज का घेतात? राखी सावंतनं केला खळबळजनक खुलासा
3 ‘चित्रपट अपयशी ठरला, पण…’; ‘रहना हैं तेरे दिल में’विषयी आर. माधवन झाला व्यक्त
Just Now!
X