News Flash

सलमानसाठी लुलियाने केलेला करवा चौथ?

तिच्या या पोस्टवरुन तिला भारतीय संस्कृती आणि उत्सवांबद्दल किती आवड आहे तेच दिसते

रोमानियन मॉडेल लुलिया वंतुर ही बॉलिवूडच्या दबंग खानची फार जवळची मैत्रीण आहे. येत्या डिसेंबरला सलमान आणि लुलिया लग्नबंधनात अडकणार अशी चर्चाही सिनेवर्तुळात सुरु आहे. लुलिया इन्स्ट्राग्रामवर सक्रिय असते. आपल्या मनातल्या भावना ती सतत इन्स्ट्राग्रामवरुन शेअर करत असते. तिच्या या पोस्टमध्ये अधिकतर मेसेज हे प्रेमाचे, आयुष्याचे आणि एकत्र राहण्याचे असतात. करवा चौथचं औचित्य साधून तिने असाच एक फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर करुन सगळ्यांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिच्या या पोस्टवरुन तिला भारतीय संस्कृती आणि उत्सवांबद्दल किती आवड आहे तेच दिसते. पण, फक्त भारतीय सण उत्सवच तिला आवडतात का की हे सगळं तिला सलमानमुळे आवडू लागलं आहे हा खरा प्रश्न आहे.
तिने एक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला साजेसा मेसेजही दिला आहे. यात ती म्हणते, ”देवाने प्रत्येकाला दोन डोळे, दोन कान, दोन हात आणि दोन पाय दिले आहे. पण या सगळ्यांना पूर्णत्व मात्र एका साजेशा हृदयानेच येते. प्रेम साजरे करा.. ही जगातली सगळ्यात सुरेख भेट आहे. करवा चौथच्या शुभेच्छा…”
तिच्या या पोस्टमुळे तिनेही सलमानसाठी करवा चौथचा उपवास ठेवला का असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. सलमानच्या खाजगी आयुष्याबद्दल नेहमीच सगळ्यांना कुतुहल राहिले आहे. त्याची प्रेयसी नेमकी कोण आहे, त्याच्या एवढ्या प्रेमभंगाची कारण काय या प्रश्नांमध्ये अनेकजण अधिक उत्सुक असतात. लुलिया आणि सलमान यांच्या नात्याबद्दलही अनेक बातम्या सतत येत असतात. सलमानच्या आईसोबत ती अनेकदा दिसली होती. तर त्याच्या घरी गणपती, रक्षाबंधनसारखा कोणताही सण असो लुलिया तिथे हजर असतेच. मध्यंतरी ‘ट्युबलाइट’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ती सलमानसोबत लडाखला गेली होती. सलमानच्या चाहत्यांनाही त्यांच्या भाईजानने लवकर लग्न करावे असेच वाटत आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला लुलियाच्या व्हिसाची मुदत संपल्यामुळे ती आपल्या मायदेशी परतली होती. त्यामुळे अनेकांना सलमान आणि तिच्यात दुरावा आला की काय अशी शंका वाटत होती. ती मायदेशी परतल्यानंतर तिच्या कुटुंबियांसोबतचे आणि मित्र परिवारासोबतचे अनेक आनंदी फोटो ती सतत इन्स्ट्राग्रामवर टाकत आहे. पण तिचा हा करवा चौथचा फोटो पाहून तिचे सलमानसोबत खरंच ब्रेकअप झाले आहे की ती अजूनही या नात्यामध्ये आहे हे कळत नाहीए.
दरम्यान, सलमान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘ट्युबलाइट’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 11:49 am

Web Title: did iulia vantur fast for salman khan on karva chauth see pic
Next Stories
1 आराध्या बच्चन रणबीरला समजली बाबा!
2 पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीबाबत ठोस धोरण हवे
3 ‘मुघल-ए-आझम’ रंगमंचावर अवतरणार
Just Now!
X