News Flash

शाहरुखचा ‘पठाण’ पुढच्या दिवाळीला होणार रिलीज?

पुढच्या महिन्यात होणार चित्रीकरणाला सुरुवात

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा २०१८मध्ये ‘झीरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर शाहरुखने कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. आता शाहरुख ‘पठाण’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दिपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहे. आता हा चित्रपट २०२१मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘शाहरुख खान आणि आदित्य चोप्रा येत्या काही दिवसांमध्ये एकमेकांना भेटणार आहेत. पुढच्या वर्षी दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल या हिशोबाने ते चित्रपटाच्या चित्रीकरणाचा विचार करत आहेत’ असे म्हटले आहे.

नोव्हेंबर महिन्यात ‘पठाण’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण हे मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. दीपिका आणि जॉन पुढच्या वर्षी चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. हा चित्रपट एक अॅक्शन चित्रपट असणार आहे.

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसात शाहरुखच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. त्यामुळे दोन वर्षांच्या ब्रेक नंतर आता शाहरुख पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच चित्रपटात शाहरुख आणि जॉन ही जोडी पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 4:05 pm

Web Title: did shah rukh khan deepika padukone and john abraham starrer pathan release on diwali 2021 avb 95
Next Stories
1 ब्रॅड पीटने लग्नाचं अमिष दाखवून फसवलं; महिलेने दाखल केली तक्रार
2 Video: ‘तारक मेहता…’मधील जेठालालला भेटली नवी दया
3 अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर करणी सेनेचा धमाका; पाठवली कायदेशीर नोटीस
Just Now!
X