13 July 2020

News Flash

इलियानाने बॉलिवूडच्या ‘या’ मोठ्या अभिनेत्याचे नाकारले होते चित्रपट

हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते.

इलियाना डिक्रूझ

दाक्षिणात्य चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिने स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. अनेकदा दाक्षिणात्य कलाकारांना बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळत नाही. पण इलियानाला दोन्ही इंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. अजय देवगण, रणबीर कपूर, वरुण धवन या अभिनेत्यांसोबत इलियानाने आतापर्यंत काम केलं आहे. पण तिने बॉलिवूडच्या एका मोठ्या अभिनेत्याच्या दोन सुपरहिट चित्रपटांना नकार दिला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला.

अभिनेता सलमान खानच्या ‘किक’ व ‘वाँटेड’ या दोन चित्रपटांची ऑफर इलियानाला मिळाली होती. मात्र काही कारणास्तव तिने या दोन्ही चित्रपटांना नकार दिला होता. ‘वाँटेड’मध्ये अभिनेत्री आशिया टाकियाने साकारलेल्या भूमिकेची ऑफर इलियानाला देण्यात आली होती. मात्र परीक्षा सुरु असल्यामुळे तो चित्रपट नाकारल्याचं इलियानाने स्पष्ट केलं. त्यानंतर ‘किक’ चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून पहिली पसंत इलियाना होती. मात्र त्यावेळी इलियानाने आधीच दुसऱ्या चित्रपटासाठी तारखा निश्चित केल्या होत्या. त्यामुळे तिला सलमानला दुसऱ्यांदा नकार द्यावा लागला होता. इलियानाने ‘किक’ नाकारल्याने चित्रपटातील भूमिका अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या पदरात पडली.

आणखी वाचा : सलमानला मागे टाकत अक्षय कुमार रचणार ‘हा’ ऐतिहासिक विक्रम

‘किक’ आणि ‘वाँटेड’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. इलियाना लवकरच ‘पागलपंती’ या चित्रपटात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 4:34 pm

Web Title: did you know that ileana dcruz rejected these two films with famous bollywood actor ssv 92
Next Stories
1 सलमानला मागे टाकत अक्षय कुमार रचणार ‘हा’ ऐतिहासिक विक्रम
2 तिने गमावले लाखो रुपये; तुम्हाला देता येईल का दीपिकासंदर्भातील या प्रश्नाचे उत्तर?
3 विकी कौशल म्हणतोय, “नो कंडोम प्लीज”; कारण…
Just Now!
X