News Flash

दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी सायरा बानो यांनी दिली माहिती, म्हणाल्या…

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले जात होते

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले जात होते. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. दरम्यान दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलीय कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

सायरा बानो यांनी नुकतीत ‘आजतक’ला मुलाखत दिली. त्यावेळी दिलीप कुमार यांच्या प्रकृती विषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘दिलीप साहब यांची प्रकृती थोडी बिघडली होती. त्यामुळे आम्ही खार येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांना घेऊन गेलो. हे एक नॉन कोविड रुग्णालय आहे. इथे आम्ही चेकअप करण्यासाठी आलो होतो. तसेच दिलीप कुमार यांची प्रकृती का बघडली आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत.’

आणखी वाचा : बनावट ओळखपत्र प्रकरणात अभिनेत्री सौम्या टंडनचंही नाव! ट्विटरवर दिलं स्पष्टीकरण

 

View this post on Instagram

 

A post shared by saira banu (@therealsairabanu)

पुढे त्या म्हणाल्या, ‘गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हे रुग्णालय नॉन कोविड आहे आणि त्यांना करोना झालेला नाही. आम्ही लवकरच घरी परत जाऊ. डॉ. नितीन गोखले आणि त्यांची संपूर्ण टीम दिलीप साहब यांची काळजी घेत आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही दोघांनीही करोना लस घेतली आहे.’

यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते. ‘आम्ही रुग्णालयात केवळ रुटिन चेकअप करण्यासाठी आलो आहोत’ असे सायरा बानो यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 4:31 pm

Web Title: dilip kumar health update saira bano talks about actors health avb 95
Next Stories
1 VIDEO: सनी लिओनीने शेअर केला ‘हिडेन बर्थडे व्हिडीओ’; सोशल मीडियावर व्हायरल
2 इंडियन आयडलच्या एका भागासाठी नेहा कक्कर घेते ‘इतके’ मानधन
3 अभिनेत्री नुसरत जहाँच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा! पती निखिल जैन अजूनही अनभिज्ञ?
Just Now!
X