30 September 2020

News Flash

इव्हान्का ट्रम्प आणि बॉलिवूड अभिनेत्याची अशी झाली भेट; फोटो व्हायरल…

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येचे बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटोशूट

अक्षय कुमारच्या ‘गूड न्यूज’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दिलजीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हान्का ट्रम्प यांच्यामुळे चर्चेत आहे. त्याचा इव्हान्कासोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायर होत आहे.

कधी आणि कुठे काढला होता हा फोटो?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्यासोबत इव्हान्का ट्रम्प देखील आल्या होत्या. दोघेही खास ताजमहल पाहाण्यासाठी गेले होते. त्यावेळी इव्हान्का यांनी एक खास फोटोशूट केले होते. त्यांच्या फोटोवर दिलजीतने स्वत:चा फोटो एडिट करुन लावला आहे.

अर्थात त्याने हे गंमत म्हणून केले आहे. त्याने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शिवाय या फोटोवर त्याने, “मी आणि इव्हान्का. ताजमहल दाखवण्यासाठी ती माझ्या मागेच लागली होती. मग काय करणार घेऊन गेलो तिला आणि दाखवला ताजमहल.” अशा आशयाचे गंमतीदार स्टेटस लिहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 6:47 pm

Web Title: diljit dosanjh ivanka trump taj mahal mppg 94
Next Stories
1 No Smoking चे धडे देणारी अभिनेत्री ओढते दिवसाला ४० सिगारेट
2 प्रियांका, दीपिकानंतर हृतिकचे हॉलिवूडमध्ये पदार्पण?
3 अतिउत्साह नडला; नाचता नाचता ‘या’ हॉट अभिनेत्रीचा पाय मोडला
Just Now!
X