News Flash

20 वर्षानंतर ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल; ‘हा’ चिमुकला झळकणार मुख्य भूमिकेत

सनी देओल आणि अमिषा पटेल पुन्हा 'गदर' मध्ये

सनी देओल, अमीषा पटेल यांची ‘गदर- एक प्रेमकथा’ तब्बल २० वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्शभूमीवर सुरु झालेली ही प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनावर चांगलीत कोरली गेली होती. अमरीश पुरी यांच रौद्ररुप, सनी देओलची दमदार अॅक्शन आणि अमिता पटेलचं मातृप्रेम अशा मनोरंजानाने परिपूर्ण असलेल्या गदर सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. या सिनेमातील गाणीदेखील प्रचंड गाजली होती.

आता पुन्हा एकदा एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांनी ही प्रेमकथा अनुभवायला मिळणार आहे. 2001 सालात आलेल्या ‘गदर- एक प्रेमकथा’ या सिनेमाचा सिक्वल लवकरच येणार आहे. सिने दिग्दर्शक अनिल शर्मा या सिनेमाच्या सिक्वलची तयारी करत असल्य़ाचं कळतंय. या सिनेमाच्या सिक्वलसाठी प्लॉट आणि स्क्रिप्टवर कामदेखील सुरु करण्यात आल्याचं एका वृत्तात सांगण्यात आलंय.

विशेष म्हणजे सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा या सिक्वलमध्ये झळकणार आहेत. याचसोबत ‘गदर- एक प्रेमकथा’ या सिनेमात सनी देओल यांच्या मुलाची भूमिका साकारणारा उत्कर्ष हा देखील या सिनेमात झळकणार आहे. उत्कर्ष का दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. उत्कर्ष ‘गदर’च्या सिक्वलमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 2018 सालात आलेल्या ‘जीनियस’ या सिनेमातून उत्कर्षने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Utkarsh Sharma (@iutkarsharma)

मिड डे च्या वत्तानुसार दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सिनेमाच्या सिक्वलबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी “सिक्वलवर चर्चा सुरु आहे. अद्याप काही सांगू शकत नाही ,योग्य वेळ आल्यावर अधिकृत घोषणा केली जाईल.” असं म्हंटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 10:22 am

Web Title: director anil sharma working on gadar movie sequel his son utkarsh will play lead along with sunny deol and amisha patel kpw 89
Next Stories
1 बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
2 ३२ लाखांची घड्याळ, १.७ लाखाचा ड्रेस प्रियांकाच्या ऑस्कर लूकने वेधल सगळ्यांच लक्ष
3 अक्षय कुमार जाणार अयोध्येमध्ये; जाणून घ्या काय आहे कारण?
Just Now!
X