बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेकदा देशातल्या परिस्थितीवर भाष्य करत असते. आताही तिने एक ट्विट केलं आहे ज्यात तिने सरकारवर टीका केली आहे. तिच्या या ट्विटला एका दिग्दर्शकाने सणसणीत उत्तर दिलं आहे.

स्वराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अरिजित सिंगचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या गाण्याच्या माध्यमातून स्वराने केंद्र सरकारवर टीका केली आहे. तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “हे गाणं केंद्र सरकारसाठी आहे ज्यांनी जबरदस्त आदेश काढले आहेत.” या व्हिडिओमध्ये अरिजित “ना फिकर, ना शर्म, ना लिहाज” हे गात आहेत.

स्वराच्या या पोस्टवर दिग्दर्शक अशोक पंडित यांनी कमेंट केली आहे. ते म्हणतात, “असंच कुढत राहा, जळत राहा, फ्रस्ट्रेट होत राहा, आपले केस उपटत राहा, राज्य तर मोदीच करणार! कारण आता नक्षल्यांचे दिवस कायमचे भरले. झोपा नाहीतर रुबिका लियाकत येईल.”

अशोक यांच्या या कमेंटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर त्यांना म्हणतो, “जेव्हा तुमच्या घरातला एखादा सदस्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध न झाल्याने मृत्यू पावेल तेव्हा बोला”. तर अजून एक युजर म्हणतो, “जर यांना देशात एवढ्या समस्या आहेत तर दुसरीकडे कुठेतरी जाऊन स्थायिक व्हा!”

स्वराला एका युजरने प्रश्न केला आहे. तो युजर म्हणतो, “राज्य सरकारांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, कर्नाटक, पंजाब या राज्यांमध्ये कोणाची जबाबदारी नाहीये का? आरोप करणं बंद करा आणि तुमचं काम करा. ज्यांना मदतीची गरज आहे त्या परिवारांना मदत करा”.