News Flash

सुशांत आत्महत्या प्रकरण : महेश भट्ट यांची पोलिसांकडून चौकशी

जवळपास दोन तास झाली चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात त्यांनी हजेरी लावली होती. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ३० हून अधिक लोकांचा जबाब नोंदवला आहे.

महेश भट्ट हे सोमवारी (२७ जुलै) सकाळी ११ च्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर जवळपास दोन तास त्यांची चौकशी पोलिसांनी केली. महेश भट्ट यांनी पोलिसांना काय उत्तर दिलं हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्यात चांगली मैत्री आहे. व्यावसायिक व वैयक्तिक गोष्टींबाबत नेहमी महेश भट्ट यांचा सल्ला विचारत असल्याचं रियाने सांगितलं होतं. महेश भट्ट यांच्या आगामी ‘सडक २’ या चित्रपटाविषयीसुद्धा पोलिसांनी काही प्रश्न विचारल्याचं समजतंय. ‘सडक २’साठी महेश भट्ट यांनी आधी सुशांतचा विचार केला होता, मात्र नंतर आदित्य रॉय कपूरची वर्णी लागली, अशी चर्चा आहे.

महेश भट्ट यांची असिस्टंट सुहरिता दास यांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होती, रिया तिच्या रिलेशनशिपच्या बाबतीत महेश भट्ट यांच्याकडून सल्ले घेत होती. सुहरिता यांनी नंतर ही पोस्ट डिलिट केली.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करत तिने ही मागणी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 2:40 pm

Web Title: director mahesh bhatt statement recorded in connection with sushant singh rajput suicide case ssv 92
Next Stories
1 सुशांत आत्महत्या प्रकरण: करणवर आरोप करताना कंगनाने आदित्य ठाकरेंचाही केला उल्लेख
2 ऑस्कर मिळाल्यानंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला कोणी काम दिले नाही- रेसुल पूकुट्टी
3 ‘मालिकेवर टीका केली पण…’; ‘अग्गंबाई सासूबाई’बाबत निवेदिता सराफ यांची पोस्ट
Just Now!
X