News Flash

‘मला धक्काच बसला..’, बिग बॉसच्या घरात राहुलने लग्नासाठी विचारताच अशी होती दिशाची प्रतिक्रिया

तिने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. नुकताच बिग बॉसचे १४वे पर्व पार पडले. या पर्वात बॉलिवूडचा गायक राहुल वैद्यने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने शोमध्ये असतानाच नॅशनल टेलिव्हिजनवर अभिनेत्री दिशा परमारला लग्नाची मागणी घातली. आता दिशाने यावर प्रतिक्रिया दिला आहे.

दिशाने नुकतीच स्पॉटबॉयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला राहुल वैद्यने सर्वांसमोर लग्नासाठी जेव्हा विचारले तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती असा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘जेव्हा त्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला तेव्हा मला ट्विटरवर मेसेज येऊ लागले. लवकरच काही तरी घडणार असे सर्वजण म्हणत होते. जेव्हा मी तो भाग पाहिला तेव्हा मला आश्चर्य वाटले. तो खूपच बोल्ड निर्णय होता. पण मला आनंद देखील झाला. तो माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होता’ असे दिशा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by RKV (@rahulvaidyarkv)

Oscar 2021 : म्हणून ‘ऑस्कर’ विजेत्यांची नावं ठेवतात गोपनीय

पुढे ती म्हणाली, ‘त्या दिवशी माझा वाढदिवस होता. आई, भाऊ आणि काही मित्रपरिवार माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. तेव्हा सर्वांनी तो एपिसोड पाहिला आणि सर्वजण खूप आनंदी झाले. मी शब्दात भावना व्यक्त करु शकत नाही. माझे उत्तर काय असेल याची पर्वा न करता त्याने सर्वांसमोर लग्नासाठी विचारले.’

दिशा परमार आणि राहुल वैद्य लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच राहुलने दिशाच्या घरी लग्नाची मागणी घातली असल्याचे म्हटले जात होते. तसेच राहुलच्या आईने त्यांच्या लग्नासाठी परवानगी देखील दिली असल्याचे समोर आले होते. आत हे कपल कधी लग्न बंधनात अडकणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुकत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 12:52 pm

Web Title: disha parmar on rahul vaidya proposing her on bigg boss 14 avb 95
Next Stories
1 ‘सुल्तान’मधील अभिनेता कुमुद मिश्रा यांना झाला करोना
2 ‘तुझा स्तनपानाचा व्हिडीओ शेअर करशील का?”; नेहा धुपियाने ‘तो’ फोटो शेअर करत दिलं उत्तर
3 ट्रोलर्सला उत्तर देताना फरहान अख्तर म्हणाला, ” घरीच राहा आणि तोंडं धुवा”
Just Now!
X