News Flash

दिशा पटानीचा बिकिनी फोटो व्हायरल; फक्त दोन तासांत मिळाले इतके लाख लाइक्स

दिशा तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलमुळे कायम चर्चेत असते.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दिशा पटानी तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाइलमुळेही कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी दिशा आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता टायगर श्रॉफ सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मालदिवला गेले आहेत. दिशा आणि टायगर सोशल मीडियावर या ट्रीपचे अनेक फोटो शेअर करत आहेत. नुकताच दिशाने सोशल मीडियावर बिकिनी लूकमधील फोटो पोस्ट केला असून त्या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय.

समुद्रात सर्फिंग बोर्डवर उभी राहत दिशाने पिवळ्या बिकिनीतील हा फोटो पोस्ट केला आहे. ‘अॅक्वामॅन फिल्स’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. अॅक्वामॅनप्रमाणेच तिने हातात एक काठीसुद्धा घेतली आहे. सोशल मीडियावर दिशाची फॅन फॉलोईंग सर्वाधिक असून तिच्या या फोटोला फक्त दोन तासांत १३ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

आणखी वाचा : रणथंबोरमध्ये आलिया-रणबीर करणार गुपचूप साखरपुडा?

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

दुसरीकडे टायगरनेही या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दिशा आणि टायगर एकमेकांना डेट करत असून दोघांनीही अद्याप खुलेपणाने त्याची कबुली दिली नाही. ‘बागी २’ या चित्रपटात हे दोघं एकत्र झळकले होते. दिशाच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास ती नुकतीच ‘मलंग’ या चित्रपटात झळकली होती. ती लवकरच सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 1:56 pm

Web Title: disha patani shares new set of snaps from her maldivian vacay with boyfriend tiger shroff dcp 98
Next Stories
1 रणबीर-आलिया साखरपुडा करणार?; काका रणधीर कपूर यांनी केला खुलासा
2 माहेरी रंगणार वहिनींच्या खेळाचा डाव; ‘होम मिनिस्टर सन्मान माहेरवाशिणीचा’ लवकरच
3 ‘मेरी राख को गंगा मे मत बहाना’; कंगना रणौतची कविता
Just Now!
X