25 February 2021

News Flash

‘भारत’नंतर मोहित सुरीच्या चित्रपटात झळकणार दिशा पटानी?

दिशासोबत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता स्क्रीन शेअर करणार आहे.

दिशा पटानी

‘बागी २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा तिच्यावर खिळवून ठेवल्या आहेत. दिशा आणि टायगरची केमिस्टी असलेल्या ‘बागी २’ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २० कोटींचा गल्ला जमवला होता. तेव्हापासून दिशाच्या फॅनफॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या येत आहेत. यापैकीच एका प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाच्या चित्रपटात दिशा झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

दिशा लवकरच अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून तिच्याकडे नव्या चित्रपटाची ऑफर आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं चित्रीकरण प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

मोहित सुरी यांचं दिग्दर्शन लाभलेला हा रोमॅण्टीक चित्रपट असून या चित्रपटात दिशासोबत अभिनेता आदित्य रॉय कपूर स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिशा-आदित्य पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दिशा साकारत असलेल्या भूमिकेसाठी प्रथम अभिनेत्री क्रिती सेननला विचारण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर दिशाला विचारण्यात आलं.  मात्र चित्रपटाच्या टीमकडून अद्यापतरी याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, लवरंजन आणि शेवाकरामी या चित्रपटाची निर्मिती करणार असून गोव्यात या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडणार आहे. सध्या चित्रपटासाठी गोव्यात सेट उभारण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 10:10 am

Web Title: disha patani will be seen in mohit suri romantic film
Next Stories
1 ही अभिनेत्री साकारणार डॉक्टर आनंदीबाईंची भूमिका
2 Photo : ‘कलंक’च्या सेटवरील आलियाचा फोटो व्हायरल
3 ‘अहिल्या’ घडवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलीस अधिकारी हा प्रवास
Just Now!
X