बुधवारपासून दोन दिवस दिग्गजांचा ‘रिवाज’
प्रख्यात तबलावादक पं. कुमार बोस, बासरीवादक पं. रोणू मुझुमदार, घटम वादक गिरीधर उदूपा आणि गायिका देवकी पंडित असे दिग्गज कलावंत ‘रिवाज’ या मैफलीद्वारे संगीतप्रेमी रसिकांसमोर शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता येणार आहेत. मैफलीची सुरुवात देवकी पंडित यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. त्यांना तबल्यावर रामदास पळसुले तर हार्मोनियमवर सुधीर नायक हे कलावंत साथसंगत करतील. त्यानंतर पं. रोणू मुझुमदार यांचे बासरीवादन, पं. कुमार बोस यांचे तबलावादन आणि घटम वादक गिरीधर उदूपा यांची अदाकारी पेश केली जाणार आहे. हा कार्यक्रम नेहरू सेंटर, वरळी येथे होणार आहे. गिरीधर उदूपा हे वयाच्या चौथ्या वर्षांपासून अदाकारी करीत असून ‘कान्नाकोल’ ही वाद्यांमधील अभ्यासक्रमातील महत्त्वाची कला सादर करतात. घटमबरोबरच कंजिरा आणि मृदंगम ही वाद्येही ते शिकले आहेत.

pen 

 

ईब्यूलियन्स

हेमाली वडालिया यांनी अलिकडे साकारलेल्या चित्रांचे ‘ईब्यूलियन्स’  हे प्रदर्शन सध्या काळा घोडा येथील आर्टिस्ट सेंटर कला दालनात भरविण्यात आले आहे. उत्साहाचे कारंजे हे प्रत्येक मानवी मनात उफाळून वर येत असते. चित्रकर्तीने कुंचल्याच्या साहाय्याने कॅनव्हासवर हा उत्साह उतू जाऊ दिला आहे. मानवी चेहरे, खेळ, निसर्ग अशा गोष्टींमध्ये भरून राहिलेला उत्साह त्यांनी चित्रांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रदर्शन १६ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.

‘डिव्हाइन’तर्फे ‘रहे ना रहे हम’
मजरुह सुलतानपुरी आणि हसरत जयपुरी या दोन महान गीतकारांनी असंख्य आशयगर्भ रचनांद्वारे रसिकांना रिझवले आहे. या दोघांच्या काव्यप्रतिभेचा वेध घेणारा ‘रहे ना रहे हम’ हा कार्यक्रम पनवेलमधील ‘दी डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड’तर्फे पनवेलमधील फडके नाटय़गृहात १५ ऑगस्ट या दिवशी रात्री साडेआठ वाजता होत आहे. मोहम्मद रफींच्या आवाजाची आठवण करून देणारा सर्वेश मिश्रा, अनुभवी गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी, संदीप शाह, मोना कामत-प्रभुगावकर, श्रीकांत कुलकर्णी, आकांक्षा पॉल आणि जयंत टिळक हे गायक यावेळी एकूण २६ गाणी सादर करणार आहेत. श्रीकांत राव यांचे शैलीदार निवेदन हेही या कार्यक्रमाचे एक वैशिष्टय़ आहे. संपर्क : चंद्रकांत मने- ८०८२० १५३०५.