News Flash

PHOTO: दिव्यांका-विवेकने गोव्यात साजरा केला ‘व्हॅलेंटाइन डे’

दिव्यांका आणि विवेक या दोघांचाही एक वेगळा असा चाहता वर्ग आहे.

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

यंदाच्या व्हॅलेंटाइन डे ला विविध सेलिब्रिटींनी हा खास दिवस साजरा केला. बिपाशा बासू, करण सिंग ग्रोवर, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह इतरही सेलिब्रिटी जोड्यांनी व्हॅलेंटाइन डे साजरा केला. यामध्ये टेलिव्हीजन सेलिब्रिटीही मागे नाहीत. ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेद्वारे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिनेही तिच्या पतीसोबत गोव्यात व्हॅलेंटाइन जे साजरा केला. दिव्यांका आणि विवेक दाहिया या दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गोव्यातील काही खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत.

दिव्यांका-विवेक हे दोघेही सध्या त्यांच्या मालिकांच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असले तरीही ते एकमेकांनाही तितकाच वेळ देतात हेच त्यांनी पोस्ट केलेले फोटो पाहताना लक्षात येते. लग्नानंतर आलेल्या पहिल्याच व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने विवेकने दिव्यांकासाठी खास बेत आखला होता. ज्यासाठी ते दोघेही गोव्याला रवाना झाले. दिव्यांकासाठी विवेकने आखलेला हा बेत म्हणजे आश्चर्याचा धक्काच होता.

दिव्यांका आणि विवेक या दोघांचाही एक वेगळा असा चाहता वर्ग आहे. टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध जोड्यांमध्येही या दोघांच्या नावालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे कामाच्या व्यग्र वेळापत्रकातूनही विवेकने दिव्यांकाला दिलेले हे खास सरप्राइज तिच्या व्हॅलेंटाइन डे चे महत्त्व वाढवून गेले असणार यात शंकाच नाही. २०१६ मध्ये विवाहबद्ध झालेल्या काही कलाकार जोड्यांपैकी एक म्हणजे दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया. काही महिन्यांपूर्वी दोघेही भोपाळमध्ये एका पारंपारिक विवाहसोहळ्यात विवाहबद्ध झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:26 pm

Web Title: divyanka tripathi and husband vivek dahiya celebrate first valentinys day in goa
Next Stories
1 आई झाल्यानंतर शिल्पालाही करावा लागला ‘बॉडी शेमिंग’चा सामना
2 VIDEO: ‘रोडिज’ स्पर्धकाला करण कुंद्राने लगावली कानशिलात
3 ‘अभिनयच चांगला नाही केला तर पीआर तरी काय करणार?’
Just Now!
X