दिवाळीसाठी अवघे काही दिवस राहिले असून सर्वत्र त्याची जोरदार तयारी सुरु आहे. करोनाचा प्रादुर्भाव असला तरी दिवाळीचा उत्साह कमी झालेला नाही. अनलॉकदरम्यान हळूहळू बऱ्याच गोष्टी सुरु आहेत आणि योग्य ते नियम पाळत मालिकांचेही शूटिंग पार पडत आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया ही राधिका मसालेची सीईओ झाल्यानंतर तिचं पहिलं लक्ष्मीपूजन असणार आहे. तर राधिका व आनंद भावोजी आणि शनाया व सौमित्र यांची भाऊबीजसुद्धा मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अनलॉकदरम्यान शूटिंग सुरू झाल्यापासून पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ यांची राहण्याची व्यवस्था ही सेटवरच करण्यात आली आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे क्रू मेंबर्स हे गेल्या चार महिन्यांपासून सेटवरच राहत आहेत. या सर्व कलाकारांचा सेटवर सन्मान करण्यात आला.

Over 150000 Complaints , Online Pornography, national cyber crime portal, 3 Years, 150 Cases fir Registere, police, rti data, crime news, Pornography news, Pornography in india, Porn sites, Porn share, mumbai, pune, maharashtra, west bangal,
अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

मालिकांच्या सेटवर दिवाळी

लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर जुलैमध्ये राज्य शासनाने जारी केलेले करोना संदर्भातील सर्व नियम पाळत मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले. सततच्या प्रवासामुळे सेटवर कलाकार तंत्रज्ञांना करोनाची बाधा होण्याच्या वारंवार घटना घडल्याने अनेक निर्मात्यांनी खबरदारी घेत सेटवर अथवा त्या जवळील परिसरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. गेल्या चार महिन्यापासून अनेक मालिकांचे कलाकार आणि तंत्रज्ञ सेटवरच तळ ठोकून आहेत. यंदा बहुतेक मालिकांमध्ये आधीच भाग चित्रित करून कलाकार आणि तंत्रज्ञांना दिवाळीचे चार दिवस सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे एका प्रदीर्घ कालावधीनंतर मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.