News Flash

डॉक्टर डॉन मालिकेत येणार नवे वळण

जाणून घ्या नेमकं काय...

मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले असल्यामुळे, नवीन भागांची गाडी जशी नव्या वेगाने धावू लागली आहे, तशीच डॉक्टर डॉन या मालिकेतील देवा म्हणजेच देवदत्त नागे आणि मोनिकाच्या म्हणजेच श्वेता शिंदेच्या प्रेमाची गाडी सुद्धा आता ट्रॅकवर येऊ लागली आहे. देवा भाई बद्दलचे मोनिकाच्या मनातील किल्मिष आता हळू हळू कमी होत आहे. त्यांची प्रेम कहाणी आकार घेत आहे.

‘झीयुवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टरडॉन’ या मालिकेचा एक मजेदार प्रोमो सध्या वाहिनीवर पाहायला मिळतोय. प्रेम मिळवण्यासाठी आणि मोनिकावर छाप पाडण्यासाठी देवा सध्या प्रयत्न करतोय. देवा आणि मोनिकाची केमिस्ट्री जुळू लागल्यामुळे, आता मालिकेत सुद्धा नवे रंग भरू लागले आहेत. शाळेच्या गणवेशात, देवाभाई मोनिका यांच्या घरी जातो. त्याच्या खास शैलीत ‘आपणसुद्धा तुमचा विद्यार्थी आहे ना, मग आपल्याला का नाही शिकवणार’ हा खास डायलॉग ऐकल्यावर मात्र मोनिका वैतागते.

देवा आता त्याच्या खास शैलीत मोनिकावर छाप पडताना दिसणार आहे. खरंतर तो आता त्यांच्या प्रेमाची बाराखडी गिरवू लागला आहे, असं म्हणता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:20 pm

Web Title: doctor don serial is on new mode avb 95
Next Stories
1 सुशांत मृत्यू प्रकरण: “बिहार पोलिसांना मी स्वत:चं ऑफिस द्यायला तयार”; संगीतकाराची ऑफर
2 ‘बचना ऐ हसीनो’फेम मिनिषा लांबाने घेतला पतीसोबत काडीमोड
3 गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागण
Just Now!
X