26 October 2020

News Flash

डॉक्टर डॉनच्या कलाकारांच्या मजेशीर सवयी…

जाणून घ्या नेमक्या काय..

मालिकांच्या शुटिंगच्या निमित्ताने दिवसातले जास्तीत जास्त वेळ कलाकार एकत्र घालवतात त्यामुळे हे कलाकार म्हणजे एक कुटुंबच बनून जातं. अशा या कुटुंबामध्ये एकमेकांशी धमाल मस्ती करणं किंवा खिल्ली उडवणं हा या कलाकारांचा आवडता विरंगुळा. असाच एक व्हिडिओ डॉक्टर डॉनच्या सेटवरुन आपल्या लाडक्या देवाने म्हणजेच देवदत्त नागेने प्रेक्षकांसोबत शेअर केलाय. हा व्हिडिओ आहे मालिकेतला कबीर म्हणजेच अनुराग वरळीकर याचा.

महत्वाचं म्हणजे यात अनुराग कोणताही स्टंट किंवा काहीही कौशल्य दाखवत नाहीये तर चक्क झोपलाय आणि त्याच्या झोपण्यावर देवदत्तने व्हिडिओ शुट केलाय. याचं कारणही तसंच आहे. अनुराग या व्हिडिओमध्ये चक्क हॅन्गर जवळ घेऊन झोपलाय हो तुम्ही बरोबर ऐकताय. हॅन्गर ज्यावर कपडे लटकवले जातात तो छातीशी कवटाळून आपला कबीर गाढ झोपलेला या व्हिडिओमध्ये देवा दाखवतोय.

देवा सांगतो की लोकं उशी जवळ घेऊन झोपतात काहींना टेडिबेअर घेऊन झोपायची सवय असते कोणी आपल्या लाडक्या मुलांना जवळ घेऊन झोपतं तर काही जण प्रेमात एकमेकांच्या मिठीमध्ये झोपलेले दिसतात. पण आमचा कबीर चक्क हॅन्गर मिठीमध्ये घेऊन झोपतो.कबीर म्हणजेच अनुरागच्या या मजेशीर सवयीमागे काय कारण आहे हे तर माहित नाही पण त्याचा हा व्हिडिओ पहाणाऱ्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर सध्या कुतुहल किंवा आश्चर्याचे भाव उमटताना दिसतायत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:39 pm

Web Title: doctor don serial on set enjoyment avb 95
Next Stories
1 RCB च्या पहिल्या विजयावर अनुष्कानं केलं विराटचं कौतुक; म्हणाली…
2 योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेवर अनुभव सिन्हा खुश; म्हणाले…
3 नव्या मैत्रीची सुरुवात? भाजपा समर्थकांनी स्वरा भास्करच्या सीरिजला दिला पाठिंबा
Just Now!
X