27 November 2020

News Flash

देवा आणि मोगरा अडकणार विवाह बंधनात? ‘डॉक्टर डॉन’ एका वेगळ्या वळणावर

मालिकेत प्रेमाचा त्रिकोण बनताना दिसतोय.

छोट्या पडद्यावरील ‘डॉक्टर डॉन’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेमध्ये आता मोगराच्या रुपाने प्रेमाचा त्रिकोण बनताना दिसतोय.

देवा, मोनिका आणि मोगरा या तिघांची भावनिक गुंतागुंत सध्या ‘डॉक्टर डॉन’ मालिकेमध्ये पहायला मिळतेय. पण हा तिढा लवकर सुटणार आहे. कारण देवा आणि मोगरा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील. पण देवा खरंच मोगराशी लग्न करेल का? हे मात्र प्रेक्षकांसाठी जाणून घेणे उत्सुकतेचे ठरेल.

देवाचा मित्र पांडे मोनिकाला जळवण्यासाठी आणि तिच्याकडून देवाबद्दलच्या प्रेमाची कबूली मिळवण्यासाठी मोगरासोबत प्रेमाचे नाटक करायला सांगतो. त्यानूसार मोगरा आणि देवा मोनिकासमोर प्रेमाचे नाटक सुरुही करतात. मोनिकाही त्यांच्या या नाटकाने अस्वस्थ होऊ लागलीये. आता पहायचे या नाटकाचा परिणाम त्यांना हवा तसाच होणार का यातही एक वेगळं ट्विस्ट मालिकेच्या प्रेक्षकांसाठी तयार असेल हे आता पहायचं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 3:38 pm

Web Title: doctor don serial turning point avb 95
Next Stories
1 अभिनेत्री कंगना रणौतला संजय राऊत यांनी सुनावलं; म्हणाले…
2 सुशांत मृत्यू प्रकरण: “तिचं करिअर असं संपवू नका”; हिना खानने दिला रियाला पाठिंबा
3 तापसीचा रियाला पाठिंबा? ट्विट चर्चेत
Just Now!
X