झी युवावरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मालिकेची कथा हटके आहेच पण मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिला आहे. म्हणूनच सोशल मीडियावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळत आहे. डॉ. मोनिका श्रीखंडे म्हणजे प्रेक्षकांची लाडकी डॉलीबाई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. तिचा अभिनय तसेच मालिकेतील लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. आता मालिकेत एका नवा कलाकाराची एण्ट्री होणार आहे.
या मालिकेत नेहमीच काही ना काही ट्विस्ट येत असतात. पण आता या मालिकेत एक नवीन एण्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोनिकाने देवाला स्वतःचे प्रेम वाचवण्यासाठी उशीर करू नको असे सांगितले होते कदाचित कोणीतरी दुसरं येऊन तिला घेऊन जाईल अशी चिंता देखील ती देवासमोर व्यक्त करते.
View this post on Instagram
आणखी वाचा- शूटिंगदरम्यान आलियाची प्रकृती बिघडली, करण्यात आले होते रुग्णालयात दाखल
आता ही दुसरी व्यक्ती शूटिंगच्या सेटवर येऊन पोहोचली आहे पण ती कोण आहे हे श्वेताने हा फोटो सोशल मीडियावर टाकून प्रेक्षकांना ओळखायला सांगितले आहे. आता हा नवीन कलाकार कोण आहे आणि मालिकेत हि नवीन व्यक्तिरेखा काय वळण घेऊन येणार आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 19, 2021 12:50 pm