News Flash

..म्हणून मी आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत नाही

माझ्या वाट्याला योग्य त्या गोष्टी आल्या आहेत.

नेहा धुपिया

बॉलिवूडमध्ये चित्रपट कलाकारांच्या वाट्याला येणाऱ्या यशाबद्दल काहीही सांगता येऊ शकत नाही. त्यातही काही कलाकार ठराविक चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या गराड्यातून बाहेर पडतातच त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे नेहा धुपिया. अभिनेत्री निहा धुपियाने तिच्या सुरुवातीच्या काळात काही चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. पण आता मात्र प्रसिद्धी आणि प्रकाशझोतापासून नेहा काहीशी दुरावल्याचे चित्र आहे. पण, या परिस्थितीतही आपण आनंदित असल्याचे नेहाने स्पष्ट केले आहे.

माझा आतापर्यंतचा प्रवास फार दूरचा होता आणि मला अजूनही खूप पुढे जायचे आहे. मला हे कळतच नाहीये की, आघाडीच्या पाच अभिनेत्रींच्या यादीत माझं नाव नसण्याचं स्पष्टीकरण मी का द्यावं? ‘मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी सध्या खूप चांगल्या परिस्थितीत आहे. इंडस्स्ट्रीमध्ये आघाडीवर असलेल्यांपैकी कित्येकजण सुखाने झोपूही शकत नाहीयेत. यासाठी त्यांना झोपेच्या गोळ्यांचा आधार घ्याव्या लागत आहेत’, असेही नेहा म्हणाली.

अभिनेत्री नेहा धुपियाने २००३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर इतरही काही चित्रपटातून नेहा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण पाहायला गेलं तर नेहाच्या वाट्याला फारशी प्रसिद्धी आली नाही हेच खरे. पण असे असूनही यातही ही अभिनेत्री तिचा आनंद शोधत आहे. ‘तुमच्या वाट्याला आलेलं यश तुमच्या आनंदाची प्रमाणं ठरवू शकत नाही. मला विचाराल तर, सध्या मी आनंदात आहे आणि समाधानी आहे. माझ्या वाट्याला योग्य त्या गोष्टी आल्या आहेत. जर मी स्वत:ची तुलना इतर अभिनेत्रींसोबत केली तर त्या विषयीच्या चर्चा कधी थांबणारच नाहीत. बॉलिवूडला जर एका शब्दात मांडायचं झालं तर मी त्याला ‘घर’च म्हणेन. माझयासाठी हे एक घरच आहे’, असेही नेहाने स्पष्ट केले.

अभिनेत्री नेहा धुपायिने चित्रपटांनंतर काही रिअॅलिटी शो मध्येही एका परिक्षकाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर हल्ली नेहा चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या #NoFilterNeha या चॅट शो मुळे. या चॅट शो मध्ये नेहा बी टाऊनमधील विविध कलाकारांसह गप्पा मारत असून कलाकारंची अनेक गुपितं उघड होत आहेत.

neha-dhupia-759

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 12:49 pm

Web Title: dont need to justify why im not in top five neha dhupia
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय चित्रपटात शाहरुख-रणबीर दिसणार एकत्र
2 आमिर-आदित्यच्या भांडणासाठी आलिया कारणीभूत?
3 प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांवर संजूबाबाच्या मुलीने साधला निशाणा
Just Now!
X