समाजसेवेचं व्रत हाती घेतलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या समाजकार्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी फार कमी जणांना माहित आहे. कलर्स मराठीवरील ‘नवरा असावा तर असा’ या कार्यक्रमात ते त्यांच्या जीवनातील काही आठवणींना उजाळा देणार आहेत. ‘नवरा असावा तर असा’ या कार्यक्रमाने तीनशे पंच्याहत्तर भागांच्या टप्पा पार केल्यानंतर प्रसारित होणाऱ्या विशेष भागात हे दाम्पत्य येणार आहेत. त्यामुळे या असामान्य जोडीची असामान्य संसारगाथा रसिकांना अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमामध्ये प्रकाश आमटे यांनी त्यांच्या लग्न, प्रेम आणि हेमलकसामध्ये केलेल्या एकत्र संसाराविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. डॉ. मंदाकिनींशी झालेली पहिली भेट, नंतर दोघांच्या मैत्रीचे प्रेमात झालेले रूपांतर, आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या मुलीशी पत्रिका, मुहूर्त, मानपान या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आनंदवनात कुष्ठरोगी व्हराडी- वाजंत्रीच्या साथीने उडालेला लग्नाचा बार या सगळ्या आठवणी डॉ प्रकाश आमटे – डॉ मंदाकिनी आमटे यांनी ‘नवरा असावा तर असा’ मध्ये जागवल्या. शहरातील चांगलं वातावरण सोडून मंदाकिनी पहिल्यांदा प्रकाश आमटे यांच्यासोबत हेमलकसामध्ये आल्या. मंदाकिनी यांनी पाहिल्यानंतर येथील लोकांनी या जोडीला ‘राम-सीता’ असं नाव दिलं.

obsessed girlfriend with a love brain disease viral
Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”
banana in 15 thousand hectares of garden dried up in Jalgaon and solapur due to summer heat
उन्हाच्या झळांचा केळीला फटका; जळगाव, सोलापुरात १५ हजार हेक्टरवर बागा सुकल्या
lakdi pool in Pune
VIDEO : पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तातडीने ‘लकडी पूल’ का बांधून घेतला? वाचा रंजक गोष्ट
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!

“रामायणातील राम सीता वनवासात गेले तेव्हा सीतेला कस्तुरीमृगाचा मोह झाला होता. मात्र हेमलकसातल्या या सीतेने कशाचाही मोह धरला नाही”, असे गौरवोद्गार मंदाताईंबद्दल बोलताना प्रकाश आमटे काढतात. तर “सुखी संसारासाठी प्रेमापेक्षाही विश्वास अधिक हवा. आमचीही छोटी भांडणं, रुसवेफुगवे होतात. पण भांडण वाढायला नको म्हणून मीच माघार घेते”, अशी प्रांजळ कबुलीही मंदाताई दिली.

दरम्यान, “जीवनात ही घडी अशीच राहू दे” हे आपलं आवडतं गाणं आहे, असं सांगत प्रकाश आमटले म्हणाले,लग्नाला ४७ वर्षे लोटली तरी पत्नीसाठी खरंच कधी साडी किंवा दागिना मी घेऊन नाही दिला, आणि तिनेही कधी मागणी केली नाही. यावर खरेदी किंवा बाजारहाट यात डॉ प्रकाश यांना कधीही रस नव्हता , त्यामुळे मलाही कधी त्यांनी आपल्यासाठी काही आणले नाही, याचे मुळीच वाईट वाटले नाही. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा गर्व वाटण्यापेक्षा आपल्याकडे जे नाही, त्याचा आनंद आम्हाला नेहमीच जास्त वाटला, असं दोघंही कबूल करतात.

असामान्य, कर्तृत्ववान जोडीचा प्रवास, गेल्या पाच दशकात वाढलेली त्यांची लोकबिरादरी, सुमारे दीडशे प्राण्यांबरोबरचा त्यांचा कुटुंबकबिला, समाजसेवेचं व्रत घेतलेली त्यांची तिसरी पिढी या सगळ्याविषयी जाणून घेता येणार आहे, २४ फेब्रुवारीला म्हणजे येत्या रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘नवरा असावा तर असा’ च्या विशेष भागात फक्त कलर्स मराठीवर !!