22 September 2020

News Flash

‘सस्ती चीज’ म्हणत दिग्दर्शकाची स्वरा भास्करवर टीका; म्हणाला..

सध्या त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आजकाल सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर उघडपणे तिची मते मांडताना दिसते. तसेच ती अनेक आंदोलनात देखील सहभागी होताना दिसते. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लगातो. पण स्वरा तिच्या अंदाजात ट्रोलर्सला सडेतोड उत्तरही देताना दिसते. नुकताच ड्रीम गर्ल चित्रपटाचा दिग्दर्शक राज शांडिल्यने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वराची खिल्ली उडवली आहे. त्यांनी स्वरा भास्कर पेक्षा जास्त तर दैनिक भास्कर महागडा आहे असे म्हटले आहे. त्यांचा या ट्विटला रिट्विट करत स्वराने त्यांना चांगलेच सुनावले आहे.

राज शांडिल्यने सोशल मीडियावर ‘स्वस्त वस्तूंवर लक्ष देऊ नका, स्वरा भास्कर पेक्षा तर दैनिक भास्कर जास्त किंमतीत विकला जातो’ असे लिहित ट्विट केले होते. या ट्विटवर स्वराने रिट्विट करत राजला चांगलेच सुनावले आहे. पुढच्या वेळी एकाद्या भूमिकेची ऑफर देताना किंवा तुमच्या आगामी चित्रपटाचे ट्रेलर शेअर करायला सांगण्याची विनंती करण्यापूर्वी तुम्ही देखील एकदा विचार करा अशा अशयाचे ट्विट स्वराने केले आहे. स्वराचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे असून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. देशात सुरु असणाऱ्या वादामुळे बॉलिवूडमधील वाददेखील समोर येत असल्याचे म्हटले जात आहे. राजने स्वराचे ट्विट पाहताच स्वराची माफी मागितली आहे.

लवकरच स्वराचा ‘शीर कोर्मा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात स्वरासोबत दिव्या दत्ता आणि शबाना आजमी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ अंसारी करत आहेत. या पूर्वी स्वरा ‘वीरे दी वेडिंग’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘निल बटा सन्नाटा’, ‘रांझणा’ आणि ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटात झळकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 1:41 pm

Web Title: dream girl director raj talk about swara bhaskar avb 95
Next Stories
1 “माझ्या ‘किरण’वर बनवला चित्रपट”; सलमाननं शाहरुखवर केला आरोप
2 ..म्हणून शाहरुख, आमिर आणि मी कधीच एकत्र काम करू शकणार नाही- सलमान खान
3 भर रस्त्यात रितेशला घालाव्या लागल्या टायगर श्रॉफला बेड्या
Just Now!
X