News Flash

मौलाना आझादांवर चित्रपट निर्मितीचे स्वप्न – अमिर खान

चुलत पणजोबा मौलाना आझाद यांनी दिलेला संदेशच '३ इडियटस' चित्रपटामधून देण्यात आला असून, त्यांच्यावर चित्रपट बनवण्याचे

| January 9, 2014 12:37 pm

चुलत पणजोबा मौलाना आझाद यांनी दिलेला संदेशच ‘३ इडियटस’ चित्रपटामधून देण्यात आला असून, त्यांच्यावर चित्रपट बनवण्याचे स्वप्न असल्याचे बॉलिवूड स्टार अमिर खान याने म्हटले आहे.
‘मनाला पटेल तेच करा’ हा संदेश मौलाना आझाद यांनी अमिर खानचे काका नसिर खान यांना दिला होता. त्यांना चित्रपट निर्मिती करण्यासाठी आझाद यांच्याकडून परवाणगी हवी होती. त्यावेळी मौलाना आझाद यांनी हा सल्ला अमिर खानचे काका नसिर खान यांना दिल्याचे बॉलिवूड स्टार अमिर खान याने सांगितले.
कोलकाता येथिल अप्पीजय कोलकाता लिटररी फेस्टीव्हलच्या उदघाटन प्रसंगी अमिर खान याने त्याच्या स्वप्नाविषयी बोलून दाखवले.
“मौलाना आझाद यांनी काका नसिर खान यांना त्यावेळी पाठिंबा दिला नसता तर ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये नसते,” असे अमिर म्हणाला.
“माझे वडिल माझ्या काकांमुळे चित्रपट क्षेत्रामध्ये आले. ते या क्षेत्रात नसते तर मी देखील दुसरीकडे कुठे तरी असतो. मला विश्वास आहे, एक दिवस मी मौलाना आझाद यांच्यावर चित्रपटाची निर्मिती करील.” असे ‘मौलाना आझाद: धर्मनिरपेक्षते बद्दलचा दृष्टीकोण’ या विषयावरील व्याख्यानात अमिर खान म्हणाला.
भारताचे पहिले शिक्षण मंत्री असणारे मौलाना आझाद अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व असल्याचे अमिरने म्हटले आहे.             

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 12:37 pm

Web Title: dream to make a film on maulana azad aamir khan
टॅग : Bollywood
Next Stories
1 सुचित्रा सेन यांच्या प्रकृतीत सुधार
2 ‘मला लग्न करण्यात रस नाही’
3 ‘स्क्रीन पुरस्कार २०१४’साठी बॉलिवूड सज्ज
Just Now!
X