News Flash

“अल्ट बालाजी पॉर्न तयार करत नाही”; अभिनेत्याचा एकता कपूरला पाठिंबा

एकताच्या 'गंदी बात' आणि 'ट्रिपल एक्स' या वेब सीरिजवर होतेय टीका

एकता कपूर ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित निर्माती म्हणून ओळखली जाते. ‘क्योकी सांस भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘नागिन’ यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांची निर्मिती करुन तिने गेली दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र या लोकप्रिय निर्मातीवर सध्या तिच्या वेब सीरिजमुळे जोरदार टीका होत आहे. ‘गंदी बात’, ‘ट्रिपल एक्स’ यांसारख्या सीरिजमधून ती अश्लिलता पसरवतेय असा आरोप केला जात आहे. या टीकाकारांना अभिनेता अमर उपाध्याय याने प्रत्युत्तर दिलं आहे. जर तुम्हाला एखादी सीरिज आवड नाही तर बघु नका असा सल्ला त्याने दिला आहे.

अवश्य पाहा – ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? दिग्दर्शकाने सांगितला अजब किस्सा

‘क्योकी सांस भी कभी बहू थी’ या मालिकेतून लोकप्रिय झालेला अमर एका नव्या वेब सीरिजच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्या या आगामी सीरिजचं नाव ‘मोलक्की’ असं आहे. या सीरिजच्या निमित्ताने अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत त्याने एकता कपूरला पाठिंबा दिला. तो म्हणाला,

अवश्य पाहा – १७ व्या वर्षी झाली होती मिस इंडिया; बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या काय करतेय?

“बालाजी टेलिफिल्म एक प्रोडक्शन हाऊस आहे. चित्रपट, मालिकांची निर्मिती करणं हा त्यांचा व्यवसाय आहे. कुठल्याही कलाकृतीची निर्मिती करण्यापूर्वी ते आधी रिसर्च करतात. आज भारतात विविध प्रकारचे प्रेक्षक आहेत. काही जण कार्टून पाहतात, काही डेली सोप, काहींना ड्रामा आवडतो, तर काहींना अॅडल्ट कॉन्टेट असलेल्या सीरिज. अल्ट बालाजीवर सर्व प्रकारच्या सीरिज तयार केल्या जातात. पण काही जण मुद्दामुन अॅडल्ट सीरिजवर निशाणा साधतात. अन् या सीरिज काही पॉर्न चित्रपटांसारख्या नसतात. बॉलिवूड चित्रपटांमध्ये जा प्रकारची दृश्य सऱ्हास दाखवतात तशीच दृश्य या वेब सीरिजमध्ये असतात. शिवाय अॅडल्ट सीरिज पाहणारा एका मोठा वर्ग भारतात आहे. त्यांना एकताच्या सीरिज आवडतात. अशा प्रेक्षक वर्गासाठी या सीरिजची निर्मिती केली जाते. ज्यांना असा कॉन्टेट पाहणं आवडत नाही त्यांनी पाहू नये. कारण आज तुमच्याकडे पाहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.” अशा आशयाचं उत्तर देत अमरने एकता कपूरला पाठिंबा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 1:14 pm

Web Title: ekta kapoor alt balaji amar upadhyay mppg 94
Next Stories
1 बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाणं का टाळतोस? अक्षय कुमार म्हणाला…
2 ‘मनी हाइस्ट’मधल्या ‘इन्स्पेक्टर रकेल’ने गायलं सलमानचं ‘चुनरी चुनरी’ गाणं; पाहा व्हिडीओ
3 ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर महेश टिळेकरांची टीका
Just Now!
X