06 August 2020

News Flash

स्मृती इराणी यांचा रॅम्पवॉक; एकताने शेअर केला throwback video

पाहा, स्मृती इराणी यांचा रॅम्पवॉक करतानाचा जुना व्हिडीओ

छोट्या पडद्यावर सर्वाधिक चाललेल्या मालिकेपैकी एक म्हणजे ‘क्यों की सास भी कभी बहु थी’ . कोणे एकेकाळी लोकप्रियतेचं सर्वोच्च शिखर या मालिकेनं गाठलं होतं. या मालिकेमुळे स्मृती इराणी म्हणजे ‘तुलसी’ हे नाव घराघरात पोहोचलं. २० वर्षांपूर्वी ही मालिका सुरू झाली होती. आठ वर्षे या मालिकेनं छोट्या पडद्यावर राज्य केलं. छोट्या पडद्यावरची यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखल्या गेलेल्या स्मृती इराणी या आता केंद्रीय मंत्री आहेत. मात्र आजही त्यांचं छोट्या पडद्याशी असलेलं नातं कायम आहे. एकता कपूर आणि स्मृती इराणी यांच्यातील मैत्री आजही पाहायला मिळते. अलिकडेच एकताने स्मृती इराणी यांचा रॅम्पवॉक करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

एकता कपूर आणि स्मृती इराणी यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. दोघीही अनेक वेळा सोशल मीडियावर एकमेकांप्रतीचं प्रेम आणि मैत्री व्यक्त करत असतात. यातच एकताने स्मृती यांचा १९९८ सालचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्मृती यांनी मिस इंडिया या स्पर्धेत भाग घेतला होता, त्यावेळी त्यांचा रॅम्पवॉक करतानाचा हा व्हिडीओ आहे.

 

View this post on Instagram

 

Appreciation Post for my friend Smriti Irani who started off not winning Miss India but went on to become a household name. This is for people who think that success comes easy…it is tough, it is hard but it comes to all those who work hard. Smriti became a household name, today is a minister. Her whole persona has changed into a powerful yet humble politician. But when she started off, she was a meek, shy, simple girl who had walked into Balaji…and we knew her smile would win hearts. Recently, a colleague of hers, who hasn’t worked with her, called her up for help, she immediately helped that person. That shows, even today she maintains relations with people who were working with her once. This humility and this attachment to her roots, makes her a fantastic person. So proud of you my friend! @smritiiraniofficial

A post shared by Erkrek (@ektarkapoor) on


“माझी मैत्रीण, स्मृती उराणी यांनी मिस इंडियाचा किताब तर नाही पटकावला, परंतु त्या प्रत्येक घराघरात पोहोचल्या. लोकप्रिय झाल्या. हे त्या लोकांसाठी आहे, ज्यांना वाटतं की यश सहज मिळतं. यश मिळवणं कठीण आहे. हे कठीण आहे, परंतु जे मेहनत करतात त्यांना यश नक्कीच मिळतं. स्मृती यांनी प्रत्येकाच्या घरात स्थान मिळवलं आणि आता त्या एक उत्तम राजकारणी, मंत्री आहेत. ज्यावेळी त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं त्यावेळी त्या अत्यंत लाजाळू होत्या. एक साधीशी मुलगी होती. मात्र आम्हाला खात्री होती की हिचं स्मितहास्य अनेकांच्या मनावर राज्य करेल”,असं एकताने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी त्यांच्याविषयी माहिती देतांना दिसत आहेत. यात त्यांनी त्यांचं वय, उंची आणि त्यांच्या शैक्षिणक आणि आवडीनिवडींविषयी माहिती देत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 11:03 am

Web Title: ekta kapoor shares smriti iranis throwback miss india 1998 ramp walk video ssj 93
Next Stories
1 घराणेशाहीवरुन शाहरुख-करणवर आरोप करणाऱ्या इंदर कुमार यांच्या पत्नीचा सलमानला पाठिंबा
2 ‘सुशांतची आत्महत्या साधी नाही’; शेखर सुमन यांनी केली सीबीआय चौकशीची मागणी
3 सुशांत सिंह आत्महत्या: नेटफ्लिक्सच्या आशिष सिंग यांचीही पोलिसांकडून चौकशी
Just Now!
X